05:09pm | Nov 17, 2021 |
पाटण : लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर (मरळी) येथे उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभ आणि ध्वजाचे लोकार्पण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई याची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, डिके फ्लेग फौंडेशनचे डॉ. राकेश बक्षी, यशराज देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरविकासमंत्री शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात हा पहिला शंभर फुटी ध्वज उभारण्यात आला आहे. ही अभिमानाची गोष्ट असून दौलतनगर येथे महारक्तदान शिबीराचे तसेच कोरोना योद्ध्यांचा सत्कारही करण्यात आला. आज महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असून रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे. या महारक्तदान शिबीरामध्ये 1 हजार 111 रक्तदान करणार आहेत. गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी असेच लोकउपयोगी काम करुन एक आदर्श निर्माण करावा.
शंभुराज देसाई म्हणाले, शंभर फुटी ध्वजाचे लोकार्पण होत आहे. तसेच 1 हजार 111 नागरिक रक्तदान करणार असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी प्राथमिक स्वरुपात रक्तदान करणाऱ्या दात्यांचा तसेच कोरोना संसर्गाच्या काळात उत्कृष्ठ काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार नगरविकासमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |