10:24pm | Dec 09, 2023 |
सातारा : येथील आरटीओ परिसरातील दिव्यांग झोनमध्ये दुसऱ्याच्या जागेवर पत्र्याच्या शेडचे पक्के बांधकाम करणाऱ्या महाभागाचे पत्र्याचे शेडचे अतिक्रमण सातारा पालिकेने जमीनदोस्त केले. या कारवाईत चार शेडचे पत्रे व अँगल काढून टाकण्यात आली आहेत. या प्रकरणावरून एका सामाजिक कार्यकर्त्याने दिव्यांग व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आरटीओ परिसरात मुख्य चौकातून जिल्हा परिषद मैदानाकडे जाताना लागणाऱ्या मार्गावर डाव्या बाजूला दिव्यांग झोन सातारा पालिकेच्या सहकार्याने तयार करण्यात आला असून तेथे 28 स्टॉलला काही वर्षाच्या मुदतीवर जागा देण्यात आली आहे. या जागेवरून काही सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी दिव्यांग बांधवांच्या नावाखाली सक्रिय झाले असून त्यांनी आपल्या टपऱ्या टाकण्याची दुकानदारी सुरू केली आहे, असा आरोप काही सामाजिक संघटनांनी केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. दिव्यांग झोन मध्ये अक्षय बाबर या दिव्यांग व्यावसायिकाला क्रमांक दोनची जागा मंजूर होती. या जागेवर दिव्यांग संघटना चालवणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यांनी चार शेड मारून अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण तात्काळ काढले जावे, अशी सूचना मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केल्यानंतर अतिक्रमण हटाव पथकाचे निरीक्षक प्रशांत निकम आणि नऊ कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन काढून टाकले. यावेळी काही जणांनी येथे हुज्जत घालत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र लोखंडी अँगल आणि पत्रे या कारवाईमध्ये जप्त करण्यात आले. सुमारे एक तास ही कारवाई सुरू होती.
दिव्यांग झोनची जागा पहिल्यापासूनच चर्चेत आहे. अक्षय बाबर याने आपल्याला संबंधित दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली. यासंदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्याकडे त्यांनी तक्रार नोंदवल्याची सांगितले.
या संदर्भात मुख्याधिकारी बापट यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दिव्यांग झोन विकसनासाठी नगरपालिका दरवर्षी 40 लाख रुपये खर्च करते. या झोनमध्ये दिव्यांग व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी जागेचे सहकार्य करून त्यांचे पुनर्वसन केले जाते. यासंदर्भात अतिक्रमणाच्या काही तक्रारी आमच्या कानापर्यंत आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |