05:53pm | Jun 17, 2021 |
वाई : वाईहून पाचगणीला जाताना पसरणी घाटात चालकाला घाटातील एक वळण लक्षात न आल्याने कार संरक्षक कठड्यावरुन काही फूट गेली. मात्र, 400 फूट दरीत कोसळण्याच्या बेतात असलेली ही कार (क्र. एमएच 12 ओटी - 6672) एका झाडाला धडकल्याने दरीत कोसळली नाही आणि कारमधील तिघाजणांचे प्राण वाचले.
याबाबत माहिती अशी, पुण्याहून पाचगणीला राहण्यासाठी स्थानिक कुलीन ठक्कर व त्यांचे कुटुंबीय आले होते. काही कामानिमित्त ते आज वाईला आले होते. वाईतील कामे संपवून पसरणी घाटातून पाचगणीला जात असताना सोळा नंबर स्टॉपजवळ मुसळधार पाऊस आणि घाटातील धुक्यामुळे चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी संरक्षक कठड्यावर चढून दरीच्या बाजूला घुसली. काही फूट अंतरावर ती दरीच्या दिशेने गेली. मात्र झाडात अडकल्यामुळे या गाडीतील एक पुरुष व दोन महिलांचे प्राण वाचले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही माहिती मिळताच वाई पोलिसांनी तात्काळ पसरणी घाटात धाव घेतली. क्रेनच्या साह्याने संबंधित गाडी बाहेर काढण्यात आली असून अपघाताची नोंद वाई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |