11:51pm | Jan 06, 2024 |
सातारा : सातारा जिल्हयामध्ये फलटण तालुक्यात बेकायदा जानवरांची कत्तल करुन मासांची विक्री करणार्या टोळीला जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी तडीपार केले. तिघांची टोळी फलटण येथील आहे.
मुबारक हानिफ कुरेशी (वय 33), शाहरुख जलील कुरेशी (वय 30), आजिम शब्बीर कुरेशी (वय 34, सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण) अशी तडीपार केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण येथे संशयित टोळी बेकायदा जनावरांची वाहतूक करुन कत्तल व मांस विक्री करत होती. याबाबतचे या टोळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि सुनिल शेळके यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा, सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुका, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका हद्दीतून दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे पाठवला. तसेच संशयित टोळीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात होती. मात्र त्याचा त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सुनावणी घेवून या टोळीला दोन वर्षासाठी तडीपार केेले.
दरम्यान, नोव्हेंबर 2022 पासून आतापर्यंत 15 उपद्रवी टोळयांमधील 49 जणांना तडीपार करण्यात आले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |