सातारा : जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला असतानाच शुक्रवारी दुपारनंतर सातारा शहरासह पाटण तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे नागिरकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी नुकसानच अधिक झाले. पाटणला घर आणि शाळेवरील पत्रे उडाले. तसेच रस्त्यावर झाडे पडून वाहतूक बंद झाली. वीजतारा तुटल्यानेही काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
सातारा शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढलेली. दरम्यानच आभाळ भरुन आलेले. त्यामुळे अवकाळी पाऊस होणार अशी चिन्हे होती. मात्र, हा पाऊस काही भागातच पडला. सातारा शहरात दुपारी अडीचच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला मोठमोठे थेंब पडले. त्यानंतर पावसाने जोर धरला. जवळपास अर्धा तास शहर आणि परिसरात पाऊस पडला. यामुळे बाजारपेठेत विक्रेत्यांसह ग्राहकांची धांदल उडाली. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.
पाटण तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली. पण, या वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. काळगाव परिसरात घरावरील छप्पर उडून गेले. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य भिजले. तर एका ठिकाणी कारवर झाड पडले. यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |