08:21pm | Oct 11, 2022 |
पुसेगाव : पुसेगाव येथील सार्वजनिक पाणी पुरवठा जलजीवन योजना मार्गी लावण्यात खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे आणि ग्रामपंचायती मधील महाविकास आघाडीचे 14 सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. विरोधक या योजनेचे श्रेय घेण्यासाठी लोकांची दिशाभूल करत असून योजनेसाठी त्यांनी काय परिश्रम घेतले ते स्पष्ट करावे, असे आवाहन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून नुकतीच पुसेगावसाठी सार्वजनिक नळपाणी पुरवठा जलजीवन योजनेसाठी 11 कोटी 77 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या योजनेच्या श्रेयवादासाठी सध्या गावात दोन गटात श्रेयवाद सुरू झाला असून याबाबत श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन संघटनेच्या पदाधिकार्यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी सरपंच विजय मसणे, रयत संघटनेचे अध्यक्ष संदिप जाधव, सुरेशशेठ जाधव, देवस्थानचे विश्वस्त गौरव जाधव, विश्वस्त संतोष वाघ, विश्वस्त सचिन देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गणेश उर्फ अभिजीत जाधव, मधूकर टिळेकर, सत्यम जाधव, सोहराब शिकलगार, संतोषशेठ तारळकर, राजू गाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राम जाधव, विकास जाधव, शहाजी देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरची योजना पूर्ण होणे गरजेचे आहे. लोकांना पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आम्ही निवडणूकी आधी जनतेला दिले होते. त्या आश्वासनाशी आम्ही कटीबध्द आहेत. श्रेय वादाच्या राजकारणातून योजनेच्या पूर्णत्वासाठी कोणताही अडथळा येणार नाही याची आम्ही दक्षता घेत असून कोणत्याही परिस्थितीत पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण केली जाईल.
महाविकास आघाडी विरोधी जनशक्ती संघटनेचा ग्रामपंचायत निवडणूकीत दारुण पराभव झाला होता. जनशक्ती संघटनेचे ग्रामपंचायत सदस्य गेल्या दीड वर्षापासून ग्रामपंचायतीच्या कारभारातून पूर्णतः अलिप्त होते. योजना मंजूर झाल्यावर मात्र योजना. आपणच मार्गी लावण्याच्या वल्गणा करत आहेत. योजना पूर्ण करायची होती तर पाच वर्ष सत्ता असताना का नाही केली असा सवाल चेअरमन बाळासाहेब जाधव यांनी केला.
पुसेगावचे सरपंच विजय मसणे, ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, रयत संघटनेचे ग्रामपंचायत सदस्य आणि रयत संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ही योजना मार्गी लागली असून या योजनेसाठी. आम्ही केलेल्या कागदपत्रांची पूर्तता बाबत आमच्याकडे भक्कम पुरावा आहे. विरोधकांनी. जनता दरबार भरवून समोरासमोर यावे, आणि आपली भूमिका स्पष्ट करावी. यानंतर जनता ठरवेल, या कामासाठी खरे व प्रामाणीक योगदान कोणाचे आहे ते असे बाळासाहेब जाधव यांनी ठणकावून सांगितले.
पाणी पुरवठा योजना पुसेगावच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी कोणताही राजकीय भेदभाव न करता सर्वांनी एकत्रीत येवून ही योजना तात्काळ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव यांनी सांगितले.
सातारा जिल्हा राष्ट्रीय कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी पुसेगाव ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व केले होते. परंतु सध्याच्या स्थितीत डॉ. जाधव हे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या प्लेक्स बोर्ड वर झळकत आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त करून चेअरमन बाळासाहेब जाधव यांनी डॉ. सुरेश जाधव यांना आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन केले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |