10:49pm | Feb 02, 2023 |
फलटण : नीरा-देवघर प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नागरी सत्कार शनिवार, दि.४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता गजानन चौक, फलटण येथे आयोजित केला असल्याची माहिती जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, अशोकराव जाधव यांनी दिली आहे.
गेली अनेक वर्षे नीरा-देवघर प्रकल्प रखडला होता. त्यासाठी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर करीत सुधारित शासकीय मान्यता दिली. त्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खूप प्रयत्न केले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व सर्व शेतकर्यांनी आपले लाडके पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळवून दिल्याने त्यांचा भव्य असा नागरी सत्कार आयोजित केला आहे. या सत्काराला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील,विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, दि.४ रोजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे खंडाळा येथे आगमन होईल. त्यानंतर खंडाळा, लोणंद येथे भाजपा व शेतकरी त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर सायंकाळी जिंती नाका फलटण येथे जाऊन तेथून त्यांची भव्यदिव्य मिरवणूक निघेल. ते मलठण मधून गजानन चौक येथे उपस्थित राहतील व त्या ठिकाणी त्यांचा भव्य असा सर्वांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |