सातारा : वडूज येथील जवान मयुर जयवंत यादव (वय- २९) यांचे अंबाला (राज्य - पंजाब) कँम्प येथे देशसेवा बजावताना अपघाती मृत्यू झाला. ही बातमी समजताच वडूज शहरावर शोककळा पसरली.
मृत मयुर यादव यांचे पार्थिव मंगळवार दिनांक १८ रोजी दुपारी बारा पर्यंत वडूजमध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मयुर जयवंत यादव हे १४५ बटालियन मध्ये लान्स नाईक या पदावर कार्यरत होते. अंबाला येथील कँम्प येथे देशसेवा बजावताना मोटारसायकल वरून जोडीदारांसोबत जात असताना स्पीड ब्रेकर वरून जवान मयुर खाली पडले असता त्यांच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने उपचारासाठी अंबाला ( पंजाब) येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान सोमवार दिनांक १७ रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत जवान मयुर यादव यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच वडूज शहरासह विद्यालयावर शोककळा पसरली होती.
मृत जवान मयुर यादव यांच्या पश्चात वडील सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक जयवंत यादव ,आई, भाऊ हर्षद , पत्नी, तीन वर्षांची आदविता ही मुलगी आहे. अंबाला ( पंजाब) येथून त्यांचे पार्थिव दिल्लीतून विमानाने पुणे येथील विमानतळावर मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यत पोहचणार आहे. पुणे येथून वाहनाने वडूजमध्ये दुपारी बारा पर्यंत त्यांचे पार्थिव पोहचेल अशी माहिती सुत्रांनी दिली. पार्थिवा सोबत त्यांचे भाऊ हर्षद यादव व मिल्ट्रीचे आँफिसर आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |