09:09pm | Feb 09, 2024 |
सातारा : हिट अँड रन कायदा त्याच्यातील सुधारणा यासंदर्भामध्ये ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसच्या शिखर समितीशी चर्चा केल्याशिवाय या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही. त्यात सूचना स्वीकारूनच त्या संदर्भात पुढील कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी केले.
दिल्ली येथे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली. या बैठकीमध्ये ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस नवी दिल्ली शिष्टमंडळ अध्यक्ष अमृतलाल मदन, चेअरमन जीआर षणमुगप्पा, माजी अध्यक्ष बालमलकीतसिंग, उपाध्यक्ष जसपाल सिंग, टोल समिती अध्यक्ष निमेश पटेल, मुकेश दवे, बी. जी. लिंग राजू व कॉंग्रेस मॅनेजिंग कौन्सिल मेंबर प्रकाश गवळी इत्यादी उपस्थित होते.
या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. यामध्ये आरटीओ बॉर्डर चेक पोस्ट अर्थात सीमा तपासणी जीएसटी करपप्रणालीमुळे आवश्यक उरले नाही. तरीही वाहतूकदारांची वाहने चेक पोस्टवर थांबवली जातात. त्यामुळे वाहतूकदारांचा वेळ, इंधन यांचा अपव्यय होतो. तसेच अडवणूक आणि वेगवेगळ्या मागण्यांच्या द्वारे भ्रष्टाचार होतो. सीमा तपासणी नाके त्वरित बंद करण्यासंदर्भात स्वतः गृहसचिवांनी सहमती दर्शवली. अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्या वतीने वैयक्तिकपणे राज्यांशी चर्चा करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या. वाहतूकदारांची प्रतिनिधित्व असणारी उच्चस्तरीय कोअर कमिटी वाहतूकदारांच्या माध्यमातून अद्ययावत करणे तसेच कोअर कमिटीला अधिकार प्रदान करणे या मागण्यांना सुद्धा मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय वाहतूक विभागाचे पियुष गोयल, परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री मध्य प्रदेश मोहनजी यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. हिट अँड रन कायद्याच्या संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. या कायद्यातील कलमांचा विचार करून यासंदर्भात निर्णय केला जाईल. वाहतूकदारांच्या कोअर कमिटीला विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही भल्ला यांच्यावतीने सांगण्यात आले.
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |