सातारा : विडणी, तालुका फलटण येथील कनिष्ठ अभियंता मीटर कनेक्शन मंजूर देण्याकरिता दोन हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदाशिव अशोक गंगावणे वय 45 मूळ राहणार प्लॉट नंबर 401 लोटस रेसिडेन्सी धानोरी रोड लोहगाव पुणे याला लाच घेताना रंगेहात पकडले.
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार हे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ आहेत. त्यांची नेमणूक विडणी, तालुका फलटण येथील आहे. त्यांच्याकडे झिरपवाडी व भाडळी बुद्रुक या गावाचा चार्ज आहे. तक्रारदार हे लोकसेवक असून त्यांच्याकडे प्राप्त ग्राहकांची नवीन वीज कनेक्शन प्रकरणे मंजूर करून मीटर देण्याची जबाबदारी होती. त्यांना गंगावणे यांनी तीन मीटर मंजूर करणे कामी तीन हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे कबूल करण्यात आले. कार्यालयाच्या परिसरातच ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस हवालदार गणेश ताटे, तुषार भोसले, निलेश येवले, नितीन गोगावले, निलेश राजपुरे, स्नेहल गुरव, शितल सपकाळ यांनी कारवाईत भाग घेतला. या कारवाईस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग साताराचे उपाधीक्षक राजेश वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |