सातारा : मराठी वृत्तपत्र लेखक संघ (मुंबई) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत सातारा जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या गुंफण दिवाळी अंकास 'स्व. विजया मनोहर कोळस्कर स्मृती अमृतप्रेरणा पुरस्कार' मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या विशेष पुरस्काराने गुंफणला गौरवण्यात आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख आणि विशेष कार्यअधिकारी मंगेश चिवटे यांच्या हस्ते गुंफणचे संपादक डॉ. बसवेश्वर चेणगे तसेच सल्लागार विकास धुळेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात विख्यात लेखक व अभिनेते दीपक करंजीकर, ज्येष्ठ स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी, शल्य चिकित्सक डॉ. प्रणय पाठारे, वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह शुभा कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त ॲड. देवदत्त लाड, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ झाला.
भारतावर ७०० वर्षात अनेक आक्रमणे होऊनही हा देश स्वतःची संस्कृती जपत सर्वाना सामावून घेऊन उभा आहे. तसेच मराठीचे झाले आहे. मराठी ही सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकाची तर जगात दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. त्यामुळे मराठीच्या भविष्याबद्दलचा न्यूनगंड काढून टाका असे विचार दीपक करंजीकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
गेली ११४ वर्षे दिवाळी अंकांनी मराठी साहित्याचा हा जागर अखंड सुरू ठेवला आहे आहे. हे सातत्य इतर भाषांमध्ये फारसे दिसत नाही. दिवाळी अंकांनी मराठी साहित्यातील विविध प्रकार हाताळले असून, त्यातून अनेक लेखक-साहित्यिक नावारूपास आले आहेत असे रविप्रकाश कुलकर्णी यावेळी म्हणाले. मंगेश चिवटे यांनी यावेळी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी आणि पत्रमहर्षी मनोहरपंत चिवटे यांच्या स्मरणार्थ दिवाळी अंकांच्या पुरस्कारासाठी ७५ हजार रुपयांची देणगी दिली. संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी गेली ४९ वर्षे दिवाळी अंक प्रदर्शन आणि स्पर्धेची परंपरा संस्थेच्या अडचणीच्या काळात कशी पार पाडली जात आहे याच्यासह संस्थेच्या कार्याचा समग्र आढावा प्रास्ताविक भाषणात घेतला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |