11:48am | May 23, 2024 |
सातारा : आरोग्य सेवाही ईश्वर सेवा आहे. महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात गरजु व गरीब जनतेवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. या रुग्णालयाच्या सोयी सुविधा व औषधांसाठी निधी उपलब्ध करुन देणार, अशी ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी दिली.
राज्यपाल बैस यांनी महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाची पहाणी केली. यावेळी ते बोलत होते. या पहाणी प्रसंगी राज्यपाल महोदयांच्या सहसचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, तहसीलदार तेजिस्विनी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जयसिंग मरीवाला, फादर टॉमी, डॉ. प्रमे शेठ, डॉ. श्रीकांत वैद्य आदी उपस्थित होते.
शिक्षण व आरोग्यावर भर दिला तर देशाची जास्त प्रगती होईल, असे सांगून राज्यपाल बैस म्हणाले, महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी सेवाभावी वृत्तीने नागरिकांना आरोग्य सेवा देत आहेत. त्यांचे काम खूप चांगले असून मागील काळातही ग्रामीण रुग्णालयाला निधी दिला असून भविष्यातही निधी दिला जाईल.
राज्यपाल बैस यांनी अपघात विभाग, आय.सी.यु. विभाग, रेडिओलॉजी विभाग, प्रयोग शाळा, महिला विभाग, बालरुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभागाची पहाणी करुन तेथील सोयी सुविधांचाही आढावा घेतला.
रुग्णांची केली आस्थेवाईकपणे चौकशी :
राज्यपाल बैस यांनी महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. रुग्णालयात उपचार व औषधे वेळेवर मिळतात का अशी विचारणा केली.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |