सातारा : वंशाला दिवा दिला नाही, माहेरची जमीन विकून पैसे दे, अशी मागणी करत शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी विवाहितेने पती, सासू विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हा प्रकार मार्च 2018 ते 23 मे 2024 या कालावधीत घडला. या प्रकरणी पती गोविंद हणमंत जाधव, सासू कुमुद हणमंत जाधव (दोघेही रा. सोमवार पेठ, सातारा) यांच्यावर आरती गोविंद जाधव (वय 28) यांच्या तक्रारीनुसार जाचहाटाचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत नमूद केले आहे की, चारित्र्याच्या संशयावरुन तसेच दुसरी मुलगी झाली, घराला वंशज दिला नाही या कारणावरुन महिलेला त्रास दिला जात होता. तुला स्वयंपाक येत नाही, आमच्या नशिबात कसली सून पडली. असे अपमानजनक बोलून मानसिक त्रास दिला जात होता. ’तुझ्या माहेरची जमीन विकून तुझ्या आईला मला पैसे द्यायला सांग. तुझ्या गावी असलेले दोन रुमचे घर माझ्या नावावर करायला सांग नाही तर नांदवणार नाही,’ अशी धमकी देवून शिवीगाळ, मारहाण केली जात होती. या प्रकरणी पोलीस नाईक यादव तपास करत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |