10:00pm | Apr 10, 2024 |
सातारा : सातारा लोकसभेच्या निवडणूकीसाठी इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आले असून, कराड, पाटणसह सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करणार आहे. आघाडीतून आमदार शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीसाठी अधिकृत घोषणा झाली असून, दि. १५ एप्रिल रोजी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.
सातारा येथे राष्ट्रवादी भवनात इंडिया आघाडीची बैठक झाली. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, तसेच श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
इंडिया आघाडीसमोर खासदार उदयनराजे यांचे आव्हान असल्याचे छेडले असता बाळासाहेब पाटील म्हणाले, या निवडणुका विचारावर आधारित लढल्या जाणार आहेत. कराड, पाटणमध्ये जवळपास ५५ टक्के मतदार आहेत; परंतु या तिन्ही मतदारसंघांबरोबरच इतर विधानसभा मतदारसंघातही मतदार मोठ्या संख्येने आहेत. या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांचे संघटन केले जाईल. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय इंडिया आघाडीतील नेत्यांनी घेतला आहे. इंडिया आघाडीचा जाहीरनामा आहे. याशिवाय जिल्ह्याचे इतर प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. प्रशासन कोणतीही हालचाल करत नाही. सत्ताधाऱ्यांत ताळमेळ नाही. मोठमोठ्या सभा घेत आहेत. परंतु, शेतकरी, कष्टकरी अडचणीत आहेत, त्यासाठी काहीच करत नसल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
सुरेश जाधव म्हणाले, राष्ट्रीय काँग्रेस हा इंडिया आघाडीचा मूळ घटक पक्ष आहे. सातारा प्रथमपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आहे. त्यांनी जो उमेदवार दिला आहे, त्यास सहमती आहे. या निवडणुका देशात लोकशाही राहणार की नाही हे ठरवणाऱ्या आहेत. देशात धर्मांध शक्तींवर अंकुश, अदानी-अंबानींवर नियंत्रण राहणार की नाही, हे ठरवणारी निवडणूक आहे. समोर कोण उमेदवार आहे यापेक्षा दोन राज्यपद्धती याचा विचार केला जाणार आहे. लोकशाहीचे रक्षण, स्त्रियांवरील अत्याचार, शेतकऱ्यांचे प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. साताऱ्याची लढाई शरद पवार विरुद्ध मोदी अशी नाही तर जातीयवादी धर्मांध शक्ती, कॉर्पोरेट भांडवलशाही याविरोधात कामगार, स्त्रिया, दलित, अल्पसंख्याक, ओबीसी यांची लढाई आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |