वाई : धोम धरणाच्या आसरे बोगदा कालव्याच्या पाण्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला. आंबेदरा आसरे (ता वाई)येथेही दुर्दैवी घटना घडली.
उत्तम सहदेव ढवळे व अभिजीत उत्तम ढवळे अशी त्यांची नावे आहेत.
धोम धरणातून भोर खंडाळा फलटण तालुक्याला बलकवडी धरणाच्या आसरे गावाजवळच्या बोगद्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. सध्या कालवा बंद आहे त्यामुळे येथे गेट टाकलेले आहे.त्यामुळे येथे पाणी साठलेले असते. या कालव्याच्या पाण्यात दुपारी पोहण्यासाठी उत्तम सहदेव ढवळे (वय ४५) व अभिजीत उत्तम ढवळे (वय १३) हे दोघे पितापुत्र गेले होते. यावेळी कालव्याच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. लोकांनी आरडाओरडा केला. त्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत.
यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व वाई आपदा ट्रेकर्स टीमच्या सुनील भाटिया यांना कळविण्यात आले. त्यांनी घटनास्थळी पाण्यात शोध मोहीम राबवली असता दोघांचेही मृतदेह सायंकाळी पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.
यावेळी या शोध मोहीमेतील सदस्य अशुतोष शिंदे (वाई )यांच्या डोक्याला बोगद्यातील लोखंडी बार लागून ते जखमी झाले. त्यांच्यावर वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी वाई येथे आणण्यात आले होते. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.
उत्तम ढवळे हे शेतकरी असून त्यांचा चिकनचा व्यवसाय होता. तसेच ते पट्टीचे पोहणारेही होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. या शोध मोहिमेत सुनील भाटिया, अमित कोळी, सचिन डोईफोडे, सौरव साळेकर, सौरभ गोळे आणि महेश बिरामने, अजित जाधव, आशिष बीरामने, ऋषिकेश जाधव, आशितोष शिंदे यांनी सहभाग घेतला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |