09:05pm | Mar 04, 2024 |
सातारा : पिंपोडे बु. ता.कोरेगाव येथे १८ दिवसांपूर्वी भगवान मच्छिंद्रनाथ सपकाळ (रा.पिंपोडे बु.) यांचा खून केल्याप्रकरणी सुशांत संजय साळुंखे (वय २२) या युवकाला अटक करण्यात आली आहे. भगवान हा सुशांतला अनैतिक कृत्य करायला प्रवृत्त करुन वारंवार छेड काढत असल्याने त्यातून त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी, दि. १६ फेब्रुवारी रोजी सुतारकी नावाच्या भगवान सपकाळ याचा खून झाला होता. यानंतर वाठार व सातारा एलसीबी पोलिसांनी घटनास्थळी जावून माहिती घेत तपासाची चक्रे गतीमान केली. अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हरतर्हेने तपासाला सुरुवात केली. मात्र पोलिसांना कोणताच धागादोरा मिळत नव्हता. यामुळे पोलिसांसमोर खूनाचे रहस्य उलगडणे हे आव्हानात्मक बनले होते. पोलिसांनी अनेकांकडे चौकशीला सुरुवात केली. मात्र तरीही पोलिसांना क्लू मिळत नव्हता.
तांत्रिक तपासावेळी पोलिसांना एक क्लू मिळाला. त्यानुसार सुशांत साळुंखे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने भगवान याचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली. त्यानुसार भगवान हा सुशांतला मानसिक त्रास देत होता. वेळोवेळी तो अश्लील बोलून गैरकृत्य करण्यासाठी दबाव आणत होता. यातूनच दोघांमध्ये वादावादीही झाली होती. दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी भगवान याने सुशांत याला पाहून अश्लील हावभाव करत छेड काढली. यातूनच दोघांमध्ये वादावादी झाली. या वादातून संतप्त झालेल्या सुशांतने भगवान याच्यावर रॉडसारख्या शस्त्राने डोक्यावर, कपाळावर हल्ला केला. भगवान रक्ताच्या थारोळ्यात पडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सुशांत गावातून पसार झाला. तांत्रिक तपासामध्ये सुशांतचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासाला गतीमानता मिळाली. भगवान वारंवार छेड काढण्यासारखे कृत्य असल्याने त्याला कंटाळूनच खून केल्याचे सुशांत याने पोलिसांना सांगितले.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, पोलिस उपअधीक्षक साेनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण देवकर, सपोनि सुधीर पाटील, रोहित फार्णे, अशोक हुलगे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, नितीन भोसले, पोलिस शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, सनी आवटे, सचिन ससाणे, स्वप्नील दौंड यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |