08:56pm | Apr 23, 2024 |
सातारा : शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला पोलिसांनी दणका देत तडीपार केले. ऐन लोकसभा निवडणूकीत पोलिसांच्या या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून एसपी समीर शेख यांच्या कालावधीत आतापर्यंत 103 जणांना तडीपार करत कारवाईचे शतक करण्यात आले.
आतीष ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे (वय 21), विशाल शेखर वाडेकर (वय 23), रामा दादा मंडलिक (वय 20, तिघे रा. शिरवळ ता, खंडाळा) व संजय विजय कोळी (वय 21 रा. खंडाळा ता.खंडाळा जि.सातारा) अशी तडीपार केलेल्या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या टोळीवर शिरवळ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, गंभीर दुखापत पोचवून शिवीगाळ दमदाटी करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्या त्यावेळी या टोळीवर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र त्यांच्यामध्ये कोणतीही सुधारणा होत नव्हती. उलट सर्वसामान्यांमध्ये त्यांची दहशत वाढतच होती. यामुळे या टोळीचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यानुसार सुनावणी झाली असता सातारा, पुणे, सोलापुर जिल्हयातून दोन वर्षासाठी टोळीला तडीपार करण्यात आले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नोव्हेंबर 2022 ते आजअखेर तडीपारीचे केले शतक केले. भविष्यातही आगामी लोकसभा निवडणुक 2024 अनुशंगाने सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |