02:40pm | Mar 31, 2024 |
सातारा : जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये तिघांना कराड न्यायालयाने आठ वर्षे सक्तमजुरीसह 25 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
रॉयल उर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा रा. वसई पालघर मुंबई, विजय शंकर पवार रा. मोळाचा ओढा सातारा आणि रवींद्र गोरखनाथ निकम रा. गोळीबार मैदान, गोडोली सातारा, मूळ रा. जांब बुद्रुक तालुका कोरेगाव अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील अनुज गंगाराम चौगुले रा. सात रस्ता, मुंबई यास निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 एप्रिल 2016 रोजी अकबर सलीम खाटीक हे त्यांचा चालक रफिक मेहबूब शेख यांच्याबरोबर त्यांच्या बोलेरो महिंद्रा मॅक्स पिकअप क्रमांक एमएच 50 - 5196 मधून निघाले होते. रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास चिपळूण-कराड रस्त्यावरील वाजेगाव, ता. पाटण पुलावर ते आले असता त्यांच्या मागून एक चारचाकी गाडी आली. त्या गाडीच्या चालकाने शेख यांच्या गाडीसमोर गाडी आडवी लावली आणि त्या गाडीतून चार जण खाली उतरले. त्यांनी शेख यांच्या गाडीत प्रवेश करून शेख यांच्याकडे रोख रकमेबाबत विचारणा केली. त्यानंतर शेख यांचा शर्ट फाडून, त्यांना मारहाण करून बनियन मध्ये लपवून ठेवलेले एक लाख तीस हजार रुपये त्यांनी काढून घेतले. यानंतर दोघांनी हातोड्याने पिकअप ची काच फोडून गाडीचे सुमारे दहा हजारांचे नुकसान केले. या लुटारूंच्या टोळीमधील एकाकडे रिव्हॉल्व्हर होते. मारामारीच्या या घटनेत त्या रिव्हॉल्व्हर मधील एक काडतूस पिकअप च्या मागील बाजूच्या चाकाकडे पडले होते. यानंतर हे चौघे त्यांच्या गाडीतून पसार झाले. यानंतर शेख यांनी याबाबतचा गुन्हा कोयना नगर पोलीस ठाण्यात नोंदवला.
पाटणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नीता अशोक पडवी आणि कोयना नगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम सिताराम वाळके यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करीत या गुन्ह्यातील चौघांना अटक केली. तसेच कराड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यू. एल. जोशी यांच्यासमोर झाली. या खटल्यामध्ये 13 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद, सादर केलेले साक्षी, पुरावे यानुसार जोशी यांनी भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 392, 394 r/w 34 अंतर्गत दंडनीय गुन्ह्यांसाठी फौजदारी प्रक्रिया, 1973 अंतर्गत रॉयल उर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा, विजय शंकर पवार आणि रवींद्र गोरखनाथ निकम यांना आठ वर्षे सक्तमजुरी आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावला आहे. या गुन्ह्यातील अनुज गंगाराम चौगुले याला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी या खटल्यामध्ये योग्य ती मदत केली.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |