पाटण : पाटण शहरानजीक संत निरंकार भवन शेजारी असणार्या इमारतीमध्ये गेली अनेक वर्ष भाड्याने राहत असलेल्या बॉबी विक्रेत्याचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
माजी गृह राज्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या पाटण तालुक्यात एकामागून एक गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. गेली अनेक वर्षे पाटणसह परिसरात बॉबी विक्रीचा धंदा करणारा रमण तेवर उर्फ आण्णा याचा तो राहत असलेल्या इमारतीच्या मागील बाजूच्या शेडमध्ये खून झाल्याचे निदर्शनास आले आहे. इमारतीच्या मागील शेडमध्ये रमण याच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने हल्ला करुन त्याच्या अंगावर बॉबीचे पोते ठेवले होते, असं घटनास्थळावरुन समजते आहे.
मृत रमण आण्णा हा तमिळनाडू येथील असल्याचे समजते आहे. तसेच त्याची पत्नी दोन दिवसापूर्वी आपल्या मूळ गावी गेली आहे. त्याला दोन अविवाहित मुले व दोन विवाहित मुली आहेत. या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. पाटण पोलिस स्टेशन चे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून या खुनाचा पुढील तपास सुरु आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |