सातारा : श्री क्षेत्र अयोध्या येथे निर्माण झालेल्या भव्य मंदिरात 22 जानेवारी रोजी श्रीराम लल्लांच्या शिल्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांनी हा सोहळा गावोगावी साजरा करण्याचा संकल्प केला आहे. या निमित्ताने सातार्यात 41 कलशांची भव्य शोभायात्रा रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय गाढवे व विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री रवी ताथवडेकर यांनी दिली आहे.
या शोभायात्रेचा मार्ग न्यू इंग्लिश स्कूल मैदान, मारवाडी चौक, राजपथावरून मोती चौक, खालच्या रस्त्याने पंचमुखी मंदिर, सम्राट चौक, जुना मोटर स्टॅन्ड चौक, पाचशे एक पाटी चौक, शेटे चौक, दंग्या मारुती चौक, कमानी हौद मार्गे राजपथावरून देवी चौक, मारवाडी चौक व तेथून पुन्हा न्यू इंग्लिश स्कूल मैदान असा आयोजित करण्यात आलेला आहे. या भव्य शोभायात्रेला सातारा जिल्ह्यातील सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शोभा यात्रेच्या मार्गावर भव्य रांगोळ्यांचे आयोजन करण्यात आले असून रथावर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजित आहे. प्रमुख चौकात होणार्या पूजनामध्ये मातृशक्तींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन निमंत्रक सोहळ्याचे संयोजक अमित कुलकर्णी व अतुल शालगर यांनी केले आहे.
हा सोहळा सातारकरांनी अत्यंत श्रद्धापूर्वक व दिमाखदारपणे साजरा करावा, असे आवाहन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कार्यक्रम संयोजक सचिन वाळवेकर, अजित देशपांडे, रामभाऊ नरळे, विजयराव फडके, विजयराव गाढवे व रवी ताथवडेकर यांनी केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |