09:24pm | Dec 08, 2023 |
सातारा : सातारा-लातूर महामार्गाचे रखडलेल काम, कामाचा निकृष्ठ दर्जा, रस्ते कंपनीचा मनमानी कारभार, सातारा-कोरेगाव मार्गावर वारंवार होणारे अपघात, यामध्ये गेलेले बळी तसेच नुकताच ट्रक अपघातात झालेला युवतीचा मृत्यू व त्यानंतर तिच्या मामाचा झालेला मृत्यू या घटनांच्या पार्श्वभूमीवर संगम माहुली फाट्यावर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीत आक्रमक भूमिका घेत सदर रस्त्याचे काम करणार्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, तसेच त्या कंपनीला पाच वर्षे काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले.
सातारा-लातूर या महामार्गाचे काम गेल्या पाच ते सहा वर्षापासून सुरू आहे, तर बॉंम्बे रेस्टॉरंट ते संगम माहुली फाट्या पर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या अडीच ते तीन वर्षापासून सुरू आहे. चार किमीच्या रस्त्याला एवढा कालावधी लागला आहे. त्यातच कंपनीने अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम केले आहे. ठिकठिकाणी अपुर्ण काम आहे. त्यामुळे यामार्गावर रोजच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. ते रोखण्यासाठी संगम नगर, विकास नगर, संगम माहुली, क्षेत्र माहुली, महागाव, सोनगाव सं. निंब, खावली येथील ग्रामस्थांनी सहा महिन्यापुर्वी रास्ता रोको केला होता. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
नुकताच दि. 3 रोजी शिरढोण ता. कोरेगाव येथील दिशा उदय घोरपडे या युवतीचा संगम नगर येथे ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. त्यानंतर दिशावर अंत्यसंस्कार सुरू असताना तिचे मामा दत्तात्रय शिंदे यांचाही ह्दयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली. संबंधीत कंपनीवर सदोष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर कारवाईसाठी मंगळवारी रास्ता रोको करण्यात आला. तीन तास रास्ता रोको केल्यानंतर आंदोलनाची जिल्हाधिकार्यांनी दखल घेत आंदोलकनकर्त्यांशी शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकार्यांनी प्रथमपासुनच आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करत मेघा इंजिनिअरींग कंपनी व एमएसआरडीसीच्या कार्यकारी संचालक अश्विनी घोडके यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. रस्त्याचे काम निकृष्ठ असल्याचे डोळ्याने दिसत आहे. काम संथगतीने सुरू आहे. अपुर्ण कामामुळे निष्पापांचे बळी गेले आहेत. अनेकजण जायबंदी झाले आहेत. वेळोवेळी आंदोलने झाली, तक्रारी झाल्या. तरीही एमएसआरडीसीकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, याची दखल घेत जिल्हाधिकारी डूडी यांनी मेघा इंजिनिअरिंगवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर त्या कंपनीला पुढील पाच वर्षे काळ्या यादीत टाकण्याचेही आदेश दिले. अपघातात ठार झालेल्या दिशाच्या कुटुंबाला या माध्यमातून मदत करण्याचेही आदेश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकार्यांनी कार्यकारी अभियंत्या अश्विनी घोडके यांची चांगलीच कान उघडणी केली.
बैठकीला रमेश बोराटे, अशोक फरांदे, बाळासाहेब जाधव, गजानन दिक्षीत, संदीप कोळपे, अभिजीत जाधव, भिमराव लोखंडे, प्रमोद फल्ले, निखिल यादव, अविनाश कोळपे, प्रकाश माने, सचिन जगताप यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |