09:36pm | Feb 23, 2024 |
सातारा : सातार्यात एक अजबच घडना घडल्याचे समोर आले असून एमआयडीसीमध्ये कंपनीच्या एका पर्यवेक्षकाने कामगारांचे पीएफ आणि एसआयची 15 लाख रुपयांची रक्कम चक्क प्रेयसीच्या बँक खात्यावर भरुन फसवणूक केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक झाली आहे.
मंगेश रमेश दुदकर (रा. संगमनगर, सातारा) आणि त्याच्या प्रेयसीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सोमनाथ रामचंद्र किर्दत (रा. चिंचणेर निंब, ता. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहराजवळील धनगरवाडी परिसरातील लक्ष्मी एंटरप्रायजेस फर्म येथे ही घटना घडली आहे. या तक्रारीनुसार कंपनी पर्यवेक्षक याने दि. 2 नोव्हेंबर 2022 पासून 14 जानेवारी 2024 पर्यंत संबंधित कंपनीत फसवणुकीचा प्रकार केला आहे.
कंपनीचे बँक खाते असून त्यामधील 15 लाख रुपयांची रक्कम कंपनी पर्यवेक्षक आणि अकाऊंटचे काम पाहणारा मंगेश दुदकर याने प्रेयसीच्या बँक खात्यावर भरले. 15 लाखांची ही रक्कम मात्र कंपनीतील कामगारांची पीएफ आणि एसआयची होती. त्याने कामगारांच्या खात्यावर रक्कम जमा केली नाही. तसेच ही रक्कम कामगारांच्या खात्यावर ऑनलाईन पाठल्याच्या खोट्या पावत्याही त्याने केल्या.
कंपनी कामगारांच्या व प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब समोर आल्यानंतर सर्व माहिती घेवून मंगेश दुदकर आणि त्याच्या प्रेयसीविरोधात फसवणुकीचा तक्रार देण्यात आली. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मंगेश दुदकर याला अटक केली आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |