सातारा : महाराष्ट्राचे नेते, माजी मंत्री, तमाम शिवभक्तांचे आधारस्तंभ, विद्यमान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज शनिवार दि. २४ रोजी साधेपणाने परंतु, उत्साहाच्या वातावरणात साजरा होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती, कुस्त्यांच्या जंगी लढती, आरोग्य शिबिरे, क्रिकेट सामने, वृध्दाश्रम, अनाथालये, रिमांड होम, भिक्षेकरी गृह, वसतीगृहे, सर्वसाधारण रुग्णालय आदी ठिकाणी मिष्टान्न भोजन-अन्नदान आणि फळे वाटपाचे नियोजन श्री. छ. उदयनराजे मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
खा. उदयनराजे भोसले हे स्वत: दि. २४ रोजी सायंकाळी ५ ते ९.३० या वेळेत राजवाडा गांधी मैदान, सातारा येथे उभारण्यात आलेल्या मंचकावर तमाम सातारकर नागरीकांच्या शुभेच्छांचा स्विकार करणार आहेत. तत्पूर्वी, शनिवार दि. २४ रोजी सकाळी आठ वाजण्याचे दरम्यान जलमंदिरपॅलेस येथे राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले तसेच राणीसाहेब श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांना औक्षण केल्यानंतर जलमंदिर पॅलेस येथील श्री तुळजाभवानी मातेचे उदयनराजे दर्शन घेवून, आर्शीवचन घेणार आहेत.
उदयनराजे हे कौटुंबिक कारणास्तव परगांवी जावून, सायंकाळी ५ वाजता जलमंदिर पॅलेस येथे परतणार आहेत. सायंकाळी ५ ते रात्रौ ९.३० पर्यत खासदार उदयनराजे भोसले हे गांधीमैदान येथे तमाम जनतेच्या शुभेच्छांचा स्विकार करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जिल्हावासियांसह सर्वांनी खा. उदयनराजे भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी गांधीमैदान येथे उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. छ. उदयनराजे भोसले मित्रमंडळाच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर आणि माजी उपनगराध्यक्ष ॲङ. दत्तात्रय बनकर यांनी केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |