सातारा : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 'शरदचंद्र पवार' पक्षाला 'तुतारी' हे चिन्ह बहाल गुरुवारी बहाल केले. त्याचे सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तुतारी वाजवून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदारपणे स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवाादी काँग्रेसे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, शफीक शेख आदी उपस्थित होते.
शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दिवशीच केंद्रीय निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी हे चिन्ह दिले आहे. भारतामध्ये लोकशाहीच्या तत्वाची पायमल्ली जी होत आहे, तिच्याविरुध्द रणशिंग फुंकण्याचे काम ही तुतारी करणार आहे. शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा महाराष्ट्रात खून केला जात आहे, त्यांच्या विरुध्द ही तुतारी जनमाणसांच्या माध्यमातून फुंकली जाईल, याबाबत आम्हां सर्वांनाच ही खात्री आहे. तुतारी हे शुभचिन्ह आहे. या तुतारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामान्य माणसांपर्यंत प्रत्येक शुभ कार्यात तुतारीच्या आवाजाने सुरुवात होत असते. कोणत्याही रणांगणात तुतारी फुंकूनच सुरुवात केली जाते.
यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळल्या बसवल्या होत्या. तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणे ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारां'साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज झाली असल्याचे सुनील माने यांनी सांगितले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |