पुसेगाव : विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच पुरेसा व्यायाम, सकस आहार व अभ्यासात नियमितपणा ठेवावा. आपले बोलणे, चालणे, वागणे आदर्शवत ठेवावे. अपयशाची भीती न बाळगता स्पर्धेत उतरावे. स्वतःस सिद्ध करावे. चांगल्या सवयी व चांगले विचार आपणास आयुष्यात यश प्राप्त करून देतात व हाच यशस्वी होण्याचा मंत्र आहे. असे विचार सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी पुसेगाव येथील सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव मधील पालक सभेत व्यक्त केले.
यावेळी डॉ. सुरेशराव जाधव, संस्था सचिव मोहनराव जाधव तसेच जेष्ट संचालक विश्वनाथराव जाधव यांचे हस्ते जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल रितेशराज मोळे, हिंदी भाषा स्पर्धेत जिल्हयात तृतीय आल्याबद्दल कुमारी भक्ती ठोंबरे तसेच कुमारी तसलीम आत्तार हिची जिल्हास्तरावर थांगता स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. संस्था उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी ग्रामीण भागात संस्था राबवत असलेले आदर्श उपक्रम यामूळे विद्यार्थी दरवर्षी यश प्राप्त करत आहेत. हुषार, गरजू विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी सहकार्य संस्था करत असते असे विचार मांडत दूरध्वनीवरून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रकाश ठोंबरे, सौ. शैला नलवडे, सुरेखा कुंभार, सौ रुपाली गुरव, सौ हेमलता तांबे, उमेश डुबल यांनी पालक मनोगते व्यक्त केली. पर्यवेक्षक मोहनराव गुरव यांनी स्वागत केले. प्राचार्य सुधाकर माने यांनी पालक शिक्षक संघाच्या नवीन कार्यकारणीस शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला. मोमीण एफ. सी. व जाधव एस. जी. यांनी शिक्षक मनोगते व्यक्त केली. घुगरे वाय. ए. यांनी सूत्रसंचालन केले. घाटगे आर. आर. यांनी आभार मानले. सभेस पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |