08:58pm | Feb 08, 2024 |
सातारा : पोवई नाक्यावरील तब्बल पन्नास वर्ष भाड्याच्या इमारतीत असणारे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय लवकरच सातारा औद्योगिक वसाहतीतील सरकारी दूध महामंडळाच्या जागी स्थलांतरित होणार आहे. येथील चार एकर भूखंडाचा ताबा सातारा एमआयडीसी औद्योगिक विभागाने कामगार आयुक्त कार्यालयाला दिला आहे. येथे कामगार सुरक्षा मंडळ तसेच सर्व प्रकारच्या कामगारांसाठी ईएसआय हॉस्पिटल उभारले जाणार आहे, अशी माहिती माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांचे चिरंजीव अभिजीत येळगावकर उपस्थित होते.
येळगावकर पुढे म्हणाले, शासकीय दूध योजना यांच्या नावे असणारा सातारा एमआयडीसी मधील 29 हजार 997 चौरस मीटर पैकी चार हजार चौरस मीटर जागा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्या कार्यालयासाठी देण्यात आलेली आहे. सहाय्यक कामगार आयुक्त रे मु भिसले यांनी यासंदर्भात प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. उद्योग कामगार मंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कामगार भवनांचे काम लवकरच सुरू होणार असून यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. हे कार्यालय प्रशस्त असणार असून दोन मजले असतानाही पहिल्या मजल्यावर प्रादेशिक कामगार आयुक्त कार्यालय तसेच कामगार भावनांसाठी स्वतंत्र जागा, सर्व प्रकारच्या कामगार वर्गासाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष अशा विविध सोयी येथे असणार आहेत. तसेच कामगारांसाठी स्वतंत्र ईएसआय हॉस्पिटल सुद्धा लवकरच येथे उभारण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले.
दूध महासंघाच्या ताब्यातील दहा एकर जागेपैकी साधारण चार एकर जागा ही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे नावे करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश कामगार मंत्री उदय सामंत यांनी सचिवांना दिलेले आहेत. तसेच येथील प्लॉटचा ताबा अधिकृतरित्या सहाय्यक कामगार आयुक्तांकडे देण्यात आलेला आहे.
सातारा जिल्ह्यात येथील एमआयडीसीच्या ठिकाणी कामगार भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल येळगावकर यांनी उदय सामंत यांचे आभार मानले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |