07:47pm | May 11, 2024 |
सातारा : उदयनराजे भोसले भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीड येथे होणार्या सभेसाठी सातार्यावरून हेलिकॉप्टरने रवाना झाले आहेत. पंकजा मुंडे यांना बहीण मानणार्या उदयनराजे यांनी त्यांच्या प्रचारासाठी कंबर कसली असून परळीची सभा ही उदयनराजे यांच्या उपस्थितीमुळे हाय होल्टेज ठरली. उदयनराजे यांनी आपल्या घनाघाती भाषणातून पंकजाताई मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन केले.
मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आहे. तत्कालीन खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून त्यांच्या भगिनी आणि भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे पुन्हा एकदा कंबर कसून तयार आहेत. बीडमध्ये शनिवारी 11 रोजी पंकजा मुंडे यांच्या प्रचाराची सांगता सभा झाली. या सभेला प्रमुख वक्ते आणि स्टार प्रचारक म्हणून सातार्यावरून खासदार उदयनराजे भोसले हेलिकॉप्टरने रवाना झाले.
येथील सातारा सैनिक स्कूलच्या कवायत मैदानावरून हेलिकॉप्टरने रवाना झालेले उदयनराजे यांनी बीडमध्ये प्रचार सभेला संबोधित केले. ते म्हणाले, राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवणार्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे सर्वधर्मसमभावाचा विचार प्रत्यक्ष आचरणात आणणार्या भाजपच्या माध्यमातून भारताचे विकास पर्व सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पार या घोषणापूर्तीसाठी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातून प्रत्येक खासदार निवडून जाणे गरजेचे आहे. त्यामुळे पंकजाताई मुंडे यांना मतदारांनी मताधिक्क्याने निवडून द्यावे, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले.
बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी मतांची विभागणी होणार असल्याची चर्चा आहे. मराठा आरक्षणाच्या मोठ्या फॅक्टर मुळे यंदाची लढाई खूपच अवघड झाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. 2009 पासून बीड लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिला आहे. विकासाचे मुद्दे म्हणाल तर सलग दहा वर्ष सत्ता असूनही नगर, बीड, परळी हा रेल्वे मार्ग अपूर्ण आहे. शेतकर्यांना सोयाबीनचे दर, ऊस उत्पादक, कापूस उत्पादक यांचे प्रश्न अद्यापही अपुरे आहेत. त्याचबरोबर बीडमध्ये ऊसतोड मजुरांचा मुद्दाही गेल्या अनेक दशकांपासून चर्चेत आहे. त्यामुळे यंदा कोणत्या मुद्द्यावर पंकजा मुंडे मतदारांना भावनिक साथ घालून मते मिळवणार, हा खरा चर्चेचा विषय आहे.
पंकजा मुंडे व खासदार उदयनराजे भोसले यांचे बहीण भावाच्या नात्याचे भावनिक बंद आहेत. या नात्याला स्मरुनच उदयनराजे भोसले सकाळी तातडीने बीडला रवाना झाले. सातार्यात नक्षत्रच्या कार्यक्रमाला पंकजाताई मुंडे यांनी आवर्जून हजेरी लावली होती. तेव्हा सातार्यात आल्यावर मला माहेरी आल्यासारखं वाटतं, असे त्यांनी केलेले विधान चांगलेच चर्चेत आले होते. या बहिण भावाच्या नात्याची खरी रंगत मतदानानंतर मतमोजणीच्या दिवशीच पाहायला मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |