05:12pm | Jul 30, 2022 |
पुसेगाव : आजपर्यंत मला अनेक पुरस्कार मिळाले. पण पद्मभूषण, आहारतज्ज्ञ व जागतिक किर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे, असे प्रतिपादन पुणे येथील समाजसेविका नंदिनी जाधव यांनी केले.
काटेवाडी ( बुध ) ता. खटाव येथील सर्वोदय सामाजीक संस्थेच्या वतीने सामाजीक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात कार्य केल्याबद्दल पद्मभूषण डॉ. पां. वा. सुखात्मे समाजभूषण पुरस्कार अंधश्रध्दा निर्मुलन व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पुणे येथील समाजसेविका नंदिनी जाधव यांना निवृत्त शाखा अभियंता धन्यकुमार कदम यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग समन्वयक श्रीमती ज्योती गायकवाड, तर उद्योजक मंगेश नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. हा कार्यक्रम प्राचार्य संजय कांबळे, श्रीमती योगिता इंगळे, प्रगतशील शेतकरी रविराज लाड, पत्रकार प्रकाश राजेघाटगे, व्हाईस चेअरमन नितीन गाडे, प्रशांत पोतदार, मिलिंद देशमुख, सुनिल रणशिंग़, जीवन इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
नंदिनी जाधव पुढे म्हणाल्या, माझा यात कोणताही स्वार्थ नाही म्हणूनच मला काम करतांना मजा येते. मी लहानपणी म्हणजे दोन वर्षाची असतांना लमाणानी पळवून नेले होते. त्यावेळी तमाशात काम करण्यासाठी, वेश्या व्यवसासायासाठी अशा मुली पळवल्या जात. पण गावातल्या लोकांना कळल्यामुळे माझी त्यातून सुटका झाली. या प्रसंगामुळे माझ्या आईने मला मुलासारखे वाढवण्याचे ठरवले आणि कणखर केले. लहानपणी विटी-दांडू, गोट्या, झाडावर चढणे असे खेळ खेळायला आवडत असत. त्याचमुळे विविध खेळांच्या स्पर्धेत भाग घेवू लागली. भालाफेक, सायकल, व्हॉलीबॉल अशा स्पर्धेत भरपूर यश मिळवले. पण मी जशी मैदानावर तरबेज होती तशीच घरकामात सुद्धा मागे राहिली नाही. कारण मी बारा वर्षाची होती तेव्हाच माझ्या आईला पॅरालिसीस होता. तेव्हापासूनच घरकाम करण्याची सवय लागली होती. त्यातही मी अनेक प्रयोग करायची. आजही कामासाठी बाहेर पडते तेव्हा पहाटे उठून स्वयंपाक, धुणं-भांडी, झाडू -पोछा असे सगळे काम पूर्ण करते.
सतत काहीतरी केले पाहिजे, लोकांच्या उपयोगी पडले पाहिजे असे मला वाटायचे. खरे तर एक ब्युटीपार्लर चालवत होते. मी त्यासाठी सिडॉस्कोचा (लळवरीज्ञे) कोर्स केला होता. त्यातही अनाटोमी सारखा अवघड विषय केवळ तीन महिन्यात शिकली. माझे सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झाले होते. या अभ्यासासाठी खूप कष्ट घेतले आणि त्या परीक्षेत मी 99% गुण मिळवले. मग पुण्यात ‘गोल्डन ग्लोरी’ नावाचे ब्युटीपार्लर सुरु केले. पार्लरचा अभ्यासक्रम कमी खर्चात व कमी वेळात शिकवण्याच्या हेतूने काम करू लागली. तीन बँकांच्या माध्यमातून तीन जिल्ह्यातल्या महिलांना पार्लरचे व विविध कला कौशल्याचे शिक्षण महिलांना मोफत दिले व स्वतःच्या पायावर उभे केले. त्या महिलांना प्रशिक्षण दिले ज्यांना कधीही बाहेर संधी मिळाली नव्हती, ज्या आर्थिकदृष्ट्या कमजोर होत्या. शिबिरात येणार्या स्त्रिया पहिल्या दिवशी एक अक्षरही बोलू शकत नसत, पण प्रशिक्षणानंतर त्यांच्यात एक आत्मविश्वास आलेला दिसे. यातून अनेक विधवा, परित्यक्ता महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ मिळाले. महिलांचे अनेक प्रश्न कळत होते, माझ्यापरीने मी त्यातून मार्ग काढत होती. असाच एक प्रयत्न म्हणजे विधवांसाठी हळदी-कुंकूवाचा समारंभ केला. त्यावेळी फक्त 32 महिला आल्या. पण मुलभूत सामाजिक मानसिकता ही अशी हळूहळूच बदलत असते.हे आपण सारेच जाणतो. बाह्यसौंदर्याची काळजी घेत होती, पण आंतरिक सौंदर्याचे काय ? हा प्रश्न माझ्या मनात निर्माण व्हायला अंनिस कारणीभूत ठरले. 2011 साली अंनिस’ची एक जाहिरात वाचण्यात आली आणि तेव्हापासून अंनिसची सभासद झाली. तेव्हा फक्त सोमवारी मिटिंग असते असे कळल्यावर ज्येष्ठ सभासदांना विचारले, आठवड्यातून केवळ एकच दिवस काम का? मी डॉ.दाभोलकरांना सुद्धा हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, मिटींगला येत जा, हळूहळू तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी जादूटोणाविरोधी कायदा व्हावा यासाठी डॉक्टरांची धडपड सुरु होती. त्याचाच एक भाग म्हणून सह्या घेण्याची मोहीम राबवली होती. त्यात मी सहभाग घेतला आणि अंनिस बरोबरचे काम सुरु झाले. जादूटोणा विरोधी कायदा पास व्हावा यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. त्यातही सहभागी झाली होती.
कंजारभाट समाजातील तरुण आणि पोलिस यांची मी कार्यशाळा घेते, प्रबोधन करते. त्यामुळे एक दबाव गट तयार झाला. अशा प्रकारच्या चाचण्या होवू देणार नाही, असा निर्धार करणार्या तरुण-तरुणींचा एक गट तयार झाला. त्या मुलांच्या मागे मी आणि अंनिसचे कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहेत. या सर्व कामांना घरच्या लोकांचा भरपूर पाठींबा आहे. म्हणूनच ती मोकळेपणाने काम करू शकते आणि त्यात पुढे जावू शकते.
यावेळी निवृत्त अभियंता धन्यकुमार कदम यांनी कोयना धरणाच्या कामावरील माहिती सांगितली.
प्राचार्य संजय कांबळे यांनी डॉ. पा. वा. सुखात्मे यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. यावेळी विविध परीक्षामध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आंब्याचे रोप व पुस्तक देऊन करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष जीवन सर्वोदयी यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्तविक निलम मोहिते यांनी केले. पुरस्काराचे वाचन दिपमाला जगदाळे यांनी केले. स्वरा माने यांनी सुत्रसंचालन केले. तर आभार भगवान सरवदे यांनी मानले.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब इनामदार, राजलक्ष्मी इंगळे, संगिता गाडे, सुभाष सोळंखी, सोपान बोराटे, सोमनाथ रणवरे, विजय शिंदे, महेंद्र बागेकरी, श्री नागनाथ विद्यालयाचे पर्यवेक्षक कांबळे, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |