सातारा : आजच्या 21 व्या शतकात जातीचा अंत अद्याप झालेला नाही. या जातीच्या सामाजिक उतरंडीवर भाष्य करणारा अंबुज नावाचा चित्रपट शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे, अशी माहिती दलित पॅंथरचे अमर गायकवाड व शाहीर प्रकाश फरांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी चित्रपटाचे निर्माता कथा पटकथा दिग्दर्शक नरेंद्र गायकवाड, दलित पॅंथरचे शहराध्यक्ष कुंदन तडाखे, आरपीआय मातंग आघाडीचे किशोर गालफाडे, वंचित आघाडीचे उमेश खंडझोडे, झोपडपट्टी सुरक्षा जिल्हाध्यक्ष मनोज घाडगे, आरपीआय कामगार संघटनेचे अजय घाडगे, शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे नितीन भिंगारदिवे उमेश खंडूझोडे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
अमर गायकवाड म्हणाले अंबुज हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 23 रोजी वेगवेगळ्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. उघडेवाडी या छोट्याशा गावातील एक मातंग कुटुंबाने आपले मूळ गाव सोडून दुसऱ्या गावात उदरनिर्वाह करताना त्यांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी अडचणी आणि त्यांची जगण्याची धडपड याचे ज्वलंत चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे.
चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आर्यन गायकवाड या बालकलाकारासह त्याचे वडील रंगा साकारणारे सुरेश पवार आजोबा रामचंद्र धुमाळ यांनी आपली भूमिका अत्यंत समरसतेने केल्याने हा चित्रपट प्रेक्षणीय झाला आहे. आजही जातीची उतरण एखाद्या कुटुंबाच्या किती अडचणी करू शकते याचे हे दहाक उदाहरण आहे
चित्रपटाची कथा छाया गायकवाड यांची आहे. निर्माता कथा पटकथा दिग्दर्शन नरेंद्र गायकवाड यांचे आहे. दत्ता ठोसरे यांनी छायाचित्रण केले असून अश्विनी कोथळे यांचे कला दिग्दर्शन आहे. सहज दिग्दर्शन माऊली खुराणे यांनी केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |