09:11pm | Feb 09, 2024 |
सातारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे शहर संघटक निलेश मोरे आणि मित्र समूहाच्या वतीने सातारा शहरात विविध ठिकाणी फळ वाटप व अन्नदान करण्यात आले. यामध्ये सातारा सिव्हिल हॉस्पिटल, एहसास मतिमंद शाळा आणि यशोधन ट्रस्ट वेळे येथे फळांचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा राजकीय माहोल सातार्यात चांगला दिसून आला.
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिंदे गटाची सातारा जिल्ह्यात जोरदार बांधणी सुरू आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेचे शहर संघटक निलेश मोरे यांनी विविध उपक्रम सातारा शहरात राबवले. येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयांमध्ये, यशोधन ट्रस्ट वेळे व सातार्यातील एहसास मतिमंद शाळा येथे फळ वाटप आणि अन्नदान करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाशल्यचिकित्सक युवराज करपे, शहर संघटक अमोल इंगोले, किरण कांबळे, उपशहरप्रमुख विक्रम यादव, अजिंक्य राजपूत, अमोल खुडे, यश खत्री, लक्ष्मण गुजर, शिवाजी गांधले, तानाजी गुजर, ओमकार गायकवाड, मनीष मेहता, साईराज इथापे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमा संदर्भात बोलताना निलेश मोरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राला वेगवेगळ्या विकासकामांच्या माध्यमातून वेगळी दिशा देण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात लोकांचा आर्थिक स्तर उंचावतो आहे. महायुतीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. असे असतानाही एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्याशी असलेली नाळ मात्र कायम ठेवली आहे. येथील विकास कामांना त्यांनी भरपूर निधी दिला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेले विविध उपक्रम हे सामाजिक बांधिलकीचे निदर्शक आहेत. यापुढेही अशा विविध उपक्रमातून ही कामे सातत्याने होत राहतील, अशी ग्वाही निलेश मोरे यांनी दिली.
ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन ऑफ सातारा (आस) ची स्थापना |
मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना तालुकास्तरीय आढावा समितीच्या सदस्य पदी नानासो उर्फ पिंटूशेठ इवरे |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |