09:33pm | Jun 08, 2024 |
सातारा : पुणे येथील पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याच्या महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर मधील अनाधिकृत एम. पी. जी. हॉटेलवर अखेर सातारा जिल्हा प्रशासनाने आज सकाळी बुलडोझर फिरवून अनाधिकृत बांधकामे तोडण्यास सुरुवात केल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रतापसिंह नगर येथील अनाधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही दुसरी सर्वात मोठी कारवाई केल्याचे मानण्यात येते.
पुणे येथील कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन कार चालकाने केलेल्या अपघातानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्या अल्पवयीन मुलाच्या वडील असणाऱ्या विशाल अग्रवाल याने संपूर्ण प्रशासन व ससून रुग्णालय मॅनेज करून आपल्या मुलाला वाचवायचा प्रयत्न केला असला तरी सगळ्याच गोष्टी उघड झाल्या. ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉक्टर अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीहरी याच्या यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली होती. या कारवाई पाठोपाठ अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याला या घटनेतील आरोपी अश्पाक मकानदार याने येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या परिसरात तीन लाख रुपये दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज आज शनिवार दि. ८ जून रोजी पोलिसांना मिळाले आहे. कल्याणी नगर येथे झालेल्या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी हा कट शिजवण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी आपर्यंत या प्रकरणात तीन लाख रुपये जप्त केले आहेत त्यापैकी डॉ. हाळनोरकडून अडीच लाख रुपये तर घटकांबळे कडून पन्नास हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बाल न्याय मंडळाच्या परिसरात घट कांबळे याने मकानदार याच्याकडून ही रक्कम स्वीकारल्याचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हे वृत्त आज सकाळी समजते तोपर्यंतच दुसरी एक मोठी घटना सातारा जिल्ह्यात घडली.
या घटनेतील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याचा महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर येथे एमपीजी क्लब हॉटेल असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली होती. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जर तो क्लब हॉटेल अनाधिकृत असेल तर त्याच्यावर बुलडोजर फिरवण्यात येईल असे स्पष्टीकरण केले होते. तशा सूचनाही त्यांनी जितेंद्र डुडी यांना दिल्या होत्या. ज्या ठिकाणी विशाल अग्रवाल याच्या हॉटेलच्या अनाधिकृत भागाचे बांधकाम करण्यात आले आहे ती जागा प्रशासनाची होती. ती जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली असून जागेचा वापर रहिवाशी कारणासाठी केला जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र त्या जागेचा वापर हॉटेल उभारण्यासाठी करण्यात आला. अनेक रूम येथे सुरू करण्यात आल्या असून त्याही अनाधिकृत पद्धतीने सुरू करण्यात आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच हे हॉटेल सील करण्यात आले होते मात्र अनाधिकृत बांधकाम कधी तोडणार यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर आज शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने अनधिकृत बांधकामे तोडायला सुरुवात केली असून क्लबवर बुलडोजर फिरवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महाबळेश्वर येथील अनाधिकृत हॉटेल व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |