08:03pm | Apr 12, 2024 |
वाई : साताऱ्यातील एका सुपुत्राने जम्मू काश्मीरमधील भारतीय सैन्य दलाच्या केंद्रात सर्वप्रथम उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यानंतर आता आसाममध्ये सैन्य दलाच्या केंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला असून, त्याचे नुकतेच अनावरण झाले आहे. ही बाब सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमान व गौरवाची ठरली आहे.
भोसे, ता. कोरेगाव येथील लेफ्टनंट कर्नल अमित विजय माने यांनी पुढाकार घेत आपल्या सहकाऱ्यांसह जम्मू काश्मीरातील कुपवावाड्यामध्ये ४१ राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाईट इन्फंट्री) बटालीयनमध्ये ७ नोव्हेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. त्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींनी तेथे जाऊन समारंभपूर्वक केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या स्वराज्याचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या नागठाणे (ता. सातारा) येथील रविराज नलवडे यांनी पुढाकार घेत आसाममध्ये सैन्य दलाच्या केंद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. चिनच्या सीमेवर आसाममधील जोहाट येथे भारतीय सैन्य दलाच्या २१ पॅरा स्पेशल फोर्स मराठा २१ युनिटचे कमान अधिकारी कर्नलपदी रविराज नलवडे (सेना मेडल) हे कार्यरत आहेत. त्यांनी व पूर्वोत्तर सीमेवर संरक्षणार्थ तैनात असलेल्या मराठासह इतर युनिटमधील अधिकारी, जवानांनी एकत्र येत शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प केलेला होता. त्यानुसार सर्वांनी स्वनिधी मधून पुतळा आणून, संरक्षक दलाची परवानगी वगेरे बाबी पूर्ण करून युनिटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.
या पुतळ्याचे अनावरण नुकतेच लेफ्टनंट कर्नल हरजितसिंग साही यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रथम रविराज नलवडे यांचा पुढाकार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुतळा उभारणीतील यशस्वी योगदानाचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा जवानांना मातृभूमीचे रक्षण करण्याची सतत प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नलवडे, २१ पॅराचे पाहिले कमान अधिकारी व्ही. बी. शिंदे, आजी माजी अधिकारी, सैनिक उपस्थित होते.
आसाममध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यामुळे भारतीय सैन्य दलातील कार्यरत अधिकारी, जवानांना जशी प्रेरणा मिळेल तद्वतच पुतळ्यामुळे शत्रूवर कायम दहशत राहील.
- हरजितसिंग साही,
लेफ्टनंट जनरल.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |