08:54pm | Apr 02, 2024 |
सातारा : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने चमकदार कारवाई करत 26 गुन्ह्यांची उकल केली आहे. यामध्ये चार जणांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे 40 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
सुनील उर्फ सुशील बबन भोसले रा. रामनगर कटकेवाडी पोस्ट वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे, रोहन बिरू सोनटक्के रा. मुरूम उमरगा जिल्हा अहमदनगर, महेंद्र रामाभाई राठोड रा. कुसेगाव दौंड जिल्हा पुणे, संदीप झुंबर भोसले रा. वाघोली जिल्हा पुणे आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 मार्च रोजी सकाळी साडेअकरा ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सातारा शहरातील एका घरात प्रवेश करून कपाटातील 9 लाख 29 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच विजय किशोर पवार यांची 6000 रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा घरफोडीचा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी हा गुन्हा उघड करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे देवकर यांनी हा गुन्हा उघड करण्याकरता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली वेगवेगळी विशेष तपास पथके तयार करून त्यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरुण देवकर व वरील तपास पथकांनी भेटी देऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच आजूबाजूच्या लोकांकडे तपास केला. तपासादरम्यान देवकर यांना हा गुन्हा पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार सुनील उर्फ सुशील बबन भोसले याने केला असून तो सातारा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना त्यास ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने भोसले यास सातारा येथे पकडून ताब्यात घेतले व त्याच्याकडे कसोशीने व कौशल्याने तपास करून त्याच्याकडून या गुन्ह्यासह बारा घरफोडीचे व दोन चोरीचे असे एकूण 14 गुन्हे उघड करून 19.7 तोळे सोने (चालू बाजारभावाप्रमाणे 13 लाख 19 हजार 900 रुपये किंमतीचे) आणि गुन्हा करण्याकरता वापरलेली हत्यारे एक बोर्ड कटर वस्तू ड्रायव्हर असा माल हस्तगत केला.
तसेच तपास पथकाने रोहन बिरू सोनटक्के, महेंद्र रामभाई राठोड, संदीप झुंबर भोसले आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा घरफोडीचे आणि सहा चोरीचे असे एकूण बारा गुन्हे उघड करून चोरीस गेलेल्या मालापैकी चालू बाजारभावाप्रमाणे 24 लाख 45 हजार पाचशे रुपये किंमतीचे 36.5 तोळे सोने व 2 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. म्हणजेच संबंधित संशयितांकडून स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचे 18, चोरीचे 8 असे एकूण 26 गुन्हे उघड करून चालू बाजारभावाप्रमाणे 37 लाख 65 हजार 400 रुपये किंमतीचे 56.2 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 40 लाख 5 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नोव्हेंबर 2022 पासून स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी असे 189 गुन्हे उघड करून या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 4 किलो 982 ग्रॅम वजनाचे 3 कोटी 10 लाख 86 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे अमित पाटील तानाजी माने, पोलिस अंमलदार सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, आतिष घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, अमोल माने, जयवंत खांडके, हसन तडवी, सनी आवटे, अजित करणे, प्रवीण कांबळे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अमित माने, स्वप्निल माने, मनोज जाधव, शिवाजी भिसे, राजू कांबळे, अरुण पाटील, अमित झेंडे, अजय जाधव, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, केतन शिंदे, धीरज महाडिक, रोहित निकम, सचिन ससाने, पृथ्वीराज जाधव, स्वप्निल दौंड, मयूर देशमुख, प्रवीण पवार, वैभव सावंत, मोहसिन मोमीन, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, विजय निकम, महिला पोलिस अंमलदार दिपाली जाधव, सौजन्या बागल, अधिका वीर, शकुंतला सणस, प्रीती पोतेकर, अनुराधा सणस, अंगुली मुद्रा विभागाचे सपोनी विजय जाधव, श्रीमती रूपाली मोरे, पोलिस अंमलदार गजानन तोडकर, मोहन नाचण, राजू कुंभार, अमोल जाधव, अनिल खटावकर, सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रशांत मोरे, महेश पवार, यशवंतराव घाडगे, रणजीत कुंभार, ओंकार डुबल यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |