सातारा : बांधकाम परवानगी संदर्भात सुलभता यावी, कामे वेळेवर सुरळीत व्हावीत म्हणुन महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी बीपीएमएस ही ऑनलाईन प्रणाली आस्तित्वात आणली. बांधकाम क्षेत्रातील निगडित सर्वांनी याचे स्वागत केले. यावर अनेक प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. परंतु आज बांधकाम परवानगी संदर्भात तर सुरळीतपणा सोडाचं बाकीचे कामे निटनेटकेपणे होईल की नाही यावरच शंका निर्माण झाली आहे.
अनेक तांत्रीक त्रुटी या प्रणाली यामध्ये आहेत. यामुळे बांधकाम परवानगी, उपभोक्ता दाखले मिळण्यास अनिश्चित कालावधी लागत आहे. सध्या ही प्रणाली बंद आहे, त्यामुळे बांधकाम परवाण्यासाठी ऑफलाईन प्रणाली सुरू करावी अशी, मागणी बिल्डर्स अससोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने करण्यात आली आहे. ज्यांना घर बांधायचे आहे, बॅंक कर्ज घ्यायचे आहे, त्यांचे स्वप्नच राहत आहे, किंवा अनेकांनी कंटाळून अनाधिकृत बांधकामास सुरुवात केली आहे, याचा रोष ते आर्किटेक्ट, इंजिनियर यांच्यावर काढत आहेत. बांधकाम व्यवसायिीकांचे बँक कर्जाचे आकडे फुगत आहेत. परिणामी याचा अंतीम बोजा घर खरेदीदारावरच येणार आहे. जसाजसा मार्च एन्ड अखेर जवळ येईल, तशी याची तिव्रता अधिक वाढणार आहे. अशातच ही प्रणाली गेले पंधरा दिवसांपासुन अनिश्चित काळासाठी बंद आहे. शासनाने नियुक्त खाजगी कर्मचारी यांच्या कडून मुदत डिसेंबर अखेर संपली असलेचे कळते.
आर्किटेक्ट इंजिनीयर स्वताच्या ॲाफिसला कमी आणि नगररचना विभागात जास्त दिसत आहेत. याबाबत अशा अनेक तक्रारी बिल्डर्स असोसिएशन कडे येत आहेत. यावर महाराष्ट्र शासनाने आतापर्यंतच्या प्रलंबित व नव्याने ३१ मार्च पर्यंत येणाऱ्या सर्व बांधकाम परवानगी अर्जावर ॲाफलाईन पद्धतीने मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसे निवेदन देण्यात आले आहे, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरचे चेअरमन किरण दंडिले, प्रमोद निंबाळकर, रणधीर भोईटे व महेशशेठ गरवालीया यांनी सांगितले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |