सातारा : सातारा शहराजवळ पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सातारा शहर ठाण्यात कार्यरत असणारे हवालदार संदीप साहेबराव कणसे हे ठार झाले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पिकअप चालकावर गुन्हा नोंद झाला आहे. मृत कणसे हे अंगापूर वंदन येथील रहिवाशी होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप कणसे (वय 47, रा. अंगापूर वंदन) हे सातारा शहर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. दि. 19 मे रोजी ते दुचाकी (एमएच, 02. सीसी, 3319) वरुन जात होते. शहरावजळील सातारा ते रहिमतपूर मार्गावर रस्ता क्रॉस करत असताना पिकअप (एमएच, 10. एडब्लू, 3721) भरधाव आली. या पिकअपची दुचाकीला जोरात धडक बसली. यामध्ये हवालदार संदीप कणसे यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना सातार्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी योगेश बापूराव कणसे (रा. अंगापूर वंदन) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार हर्षद महेंद्र कदम (रा. चाफेर, ता. पाटण) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिरोळे करत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |