08:51pm | Apr 09, 2024 |
फलटण : एकावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी अद्याप मोकाट फिरत असून फलटण ग्रामीण पोलिसांना दीड महिन्यानंतरही संशयितांचा थांगपत्ताच लागत नसल्याने त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजुरी गावाच्या राजुरी चौफुला परीसरात युवा उद्योजक विनोद सांगळे यांच्यावर तलवार व लोखंडी रॉडने पाचजणांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद होवून 45 दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट आहेत. तसेच खुलेआमपणे परीसरात वावरत आहेत.
धमकावणे, खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण हत्याराने मारहाण, जिवे मारण्याचा प्रयत्न आदींसह आरोपींवर यापूर्वीही 326, 354 यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. डोक्यावर हातावर लोखंडी रॉडने, तलवारी ने मारहाण करून डोके व हात फ्रॅक्चर केले होते. फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. एकूण 14 कलमान्वये हा गुन्हा दाखल आहे. विनोद सांगळे यांनी 26 फेब्रुवारी रोजी फलटण ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली होती.
याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने व मुंबई हायकोर्टाने या आरोपींचा जामिन फेटाळला असून याचा तपास वरीष्ठ अधिकार्यांकडे आहे. असे असून सुद्धा पोलिसांच्या प्रेमामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट आहेत. त्यामुळे फलटण ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |