08:56pm | Apr 16, 2024 |
सातारा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्या घोटाळ्याचा उल्लेख विरोधक करतात, त्याचा आणि माझ्यासह बाजार समितीतील संचालकांचा काडीमात्र संबंध नाही. ऐन लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघांमध्ये खासदार शरद पवार यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने जनता उभी राहिली, हे पाहून विरोधकांनी षडयंत्र रचून माझ्यावर बेछूट आरोप केले आहेत, अशी टीका महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबई बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मुंबई बाजार समितीचे अनुषंगाने आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, लोकशाहीमध्ये निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप होतात. मात्र, सध्या यंत्रणेचा वापर करून राजकीय विश्वासार्हता संपविण्याचा घाणेरडा प्रयत्न आरोप करणार्यांकडून होत आहे. ज्या चार हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत आरोप करणारे बोलत आहेत, त्याबाबत दोषी कोण आहेत, हेच ठरलेले नाही. मी आत्तापर्यंत सुसंस्कृत राजकारण केले. माणूस मोठा झाला की काही लोकांमध्ये असूया निर्माण होते.
सरकारी यंत्रणेचा वापर करून बाजार समितीतील घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे न्यायदेवतेकडे न्याय मागावा लागला. बाजार समितीतील आमचे संचालक मंडळ 2008 मध्ये अस्तित्वात आले आहे, तर व्यापार्यांना गाळेवाटप हे 1990 मध्ये झालेले आहे. या व्यापार्यांना बाजार समितीतील त्यांचा वाढीव एफएसआय हवा होता. त्यामुळे त्यांनी बाजार समितीकडे अर्ज केला होता. बाजार समितीचे संचालक मंडळाने त्याच्यावर ठराव करून तो पणन मंत्रालयाला पाठवला होता. भाजपचे नेते तत्कालीन पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्याला मान्यता दिली होती. या प्रस्तावाला पर्यावरण दिल्ली यांची मागणी घेतली होती. त्यानंतर सिडको महानगरपालिकेला योग्य तो कर भरला होता आणि बाजार समितीने व्यापार्यांकडून चेकने पैसे घेऊन ते खात्यावर भरलेले आहेत. हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मग विरोधक चुकीचे आरोप कशासाठी करत आहेत? निवडणुकीनंतर खोटे आरोप करणार्यांच्या विरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करणार आहे, असा इशाराही शिंदे यांनी दिला.
शशिकांत शिंदे म्हणाले -
- जनतेच्या मैदानात लढूया; रडीचा डाव कशाला खेळताय?
- ज्यांना खुर्चीवर बसवले तेच उलटले.
- घोटाळे संबंधात ज्या तक्रारदाराने आरोप केले होते त्याला आत्महत्या करण्यास कोणी भाग पाडले याची चौकशी व्हावी.
- उदयनराजे राष्ट्रवादीत असताना त्यांचा केलेला प्रचार त्याचाच संबंधितांना राग.
- जामीन घेतला नसता तर सत्ताधार्यांनी सहा महिने कैदेत बसवले असते.
- आमचा दोष नसताना आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होतोय.
- चार हजार कोटींचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्ती घेईन.
- गांधी मैदानावर कशाला, मुंबई बाजार समितीत समोरासमोर येऊन बोलू.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
मुंबई बाजार समितीच्या घोटाळ्यात दोषी कोण? हे अजून ठरलेले नाही.
या प्रकरणात राजकीय अधिकाराचा गैरवापर केला जातोय.
वास्तविक एफएसआय च्या घोटाळ्यासंदर्भात आरोप होतोय तो एफएसआय अजूनही बाजार समितीच्या ताब्यात
या घोटाळ्याप्रकरणी संचालकांचा दोष नाही असे पणन संचालकांचे स्पष्टीकरण
व्यापार्यांचे 62 कोटी रुपये बाजार समितीत सुरक्षित
व्यापार्यांना 1990 सालीच गाळेवाटप
विद्यमान संचालकांचा गाळेवाटपाशी संबंध नाही
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व अनेक दिग्गज मंडळींनी केले. पण सध्याचा लोकप्रतिनिधी हा अत्यंत बालिश आणि भंपक लोकप्रतिनिधी मतदारसंघाला भेटला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ही परिस्थिती बघायला मिळते आहे.
- बाळासाहेब सोळसकर
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |