सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सव बहरत चाललेला आहे. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्यांजली, नृत्यप्रभा ग्रुपने 'ईश्वर' हे भरतनाट्यम सादरीकरण केले. ह्या नृत्यासेवेमधे भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यातील शंकरावर आधारित रचना प्रस्तुत केल्या. जसे की - पार्वतीचे लास्य व महादेवाचे तांडव याचा मिलाफ दाखवणार्या व रागमालिकेमधे बांधलेले अर्धनारीश्वर स्तोत्र याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कळीप्रमाणे उमलणार्या सुबक हालचालींचा चतुश्र अलारीपू, कल्याणी रागातील जतिस्वरम व शिव अर्धांगिनी देवी ची स्तुती, मुथुस्वामी दीक्षितार यांच्या अमृतवर्शिणी रागातील रचनेचे सादरीकरण झाले.
रेवती रागातील महादेव शिव शंभो हे कीर्तनम् आणि त्यापुढे शंकर पार्वतीचा मजेशीर संवाद दाखवणारे पदम, त्रिपूरासुर राक्षसाच्या वधाचे वर्णन असलेले कीर्तनम अशा मराठी भाषेतील रचना प्रस्तुत केल्या गेल्या. पदम सादर होताना यामध्ये पार्वती व शंकर यांच्यातील मजेशीर संवाद ..कोण कवाड उघडतो.. या मराठी रचनेवर कापी रागात सादर केला. ही रचना शहाजीराजे यांची होती. त्यानंतर त्रिपुरा स्वराचा वध करणाऱ्या शंकराचे वर्णन असलेली कीर्तन ही नृत्य रचना ..अघटीत सये शिवलीला वर्णिता शेश ही भागला ..या मराठी भाषेतील निलांबरी रागातील रचनेवर खंड अटआलात सादर झाली. ही रचना सरफोजी राजे भोसले यांनी केलेली होती. मार्गमप्रमाणे कार्यक्रमाच्या सांगतेसाठी जोरकस हालचाली असलेला आणि संगीताची पर्वणी असलेला हिंदोलम रागातील आदितलात बांधलेला तिल्लाना सादर होताना संगीताचे आकर्षण आणि चैतन्य कसे निर्माण होते. याचे सुरेख सादरीकरण कलाकारांनी आपल्या नृत्यातून घडविले व नृत्यसेवेचा शेवट 'विश्वेश्वर दर्शन कर' असे म्हणत ईश्वराशी एकरूप होऊन शांत रसामधे घेऊन जाणाऱ्या भजनाने झाला.
कार्यक्रमात गुरू वैशाली पारसनीस,सायली कुलकर्णी,कविता तोलपाडी, पल्लवी सहस्रबुद्धे, अमृता जमदग्नी आणि नृत्यांजली नृत्यसंस्थेच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. अनुजा बोकील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
भरतनाट्यम सुरू असताना सातारा शहरातील आयुष विष्णू शेट्टी आणि रितेश जांगिड या बालकलाकारांनी आपली चित्रे रेखाटली.
या नृत्यांजली नृत्यसंस्थेच्या कलाकारांचा सत्कार नटराज मंदिराचे वतीने स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी महोत्सवाच्या संयोजिका उषा शानभाग, पत्रकार अतुल देशपांडे, नारायण राव, मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन, शहाणे तसेच साताऱ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |