फलटण : मुंजवडी (ता. फलटण) येथील पवारवस्तीत घराशेजारील महिलेशी अनैतिक संबधाच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा खून झाला.
सीताबाई किसन सस्ते (रा. पवारवस्ती, मुंजवडी, ता. फलटण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची तक्रार प्रमिला सोमनाथ सस्ते (रा. पवारवस्ती) यांनी फलटण पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, संशयितांपैकी तानाजी घुले यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंजवडीतील पवारवस्ती (ता. फलटण) येथे रविवारी रात्री दहाच्या सुमारास प्रमिला सोमनाथ सस्ते व त्यांचे पती सोमनाथ किसन सस्ते व सासू सीताबाई किसन सस्ते हे सर्व घरात एकत्र बसले होते. त्याचवेळी सोमनाथ किसन सस्ते यांचे घराशेजारील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चिडून जाऊन रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले व स्वाती रमेश घुले यांनी घरात घुसून सोमनाथ सस्ते यांना मारहाणीस सुरुवात केली. मारहाण करतेवेळी झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या सासू, सोमनाथ यांच्या आई सीताबाई किसन सस्ते यांच्या पोटात चाकूने वार केल्याने त्या जखमी झाल्या आणि मग उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यांनतर पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गोडसे करत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |