सातारा : किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृणपणे खून करून पळून गेलेल्या नराधमास एका तासात जेरबंद करण्यात लोणंद पोलिसांना यश आले आहे.
सयाजी शंकर निंबाळकर राहणार आदर्की खुर्द, ता. फलटण, जि. सातारा असे खून करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आदर्की खुर्द, ता. फलटण, जि. सातारा येथे चिंचेचा मळा नावाच्या शिवारात चंद्रशेखर बबनराव निंबाळकर रा. आदर्की खुर्द, ता. फलटण, जि. सातारा यांनी तेथीलच सयाजी शंकर निंबाळकर यांच्या शेताच्या बांधावरून बोरवेल ची मशीन व पिकअप जीप नेऊन बांध खराब केल्याचा राग मनात धरून सयाजी शंकर निंबाळकर याने चंद्रशेखर निंबाळकर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांचा खून केला. याबाबतची फिर्याद चंद्रशेखर निंबाळकर यांचा मुलगा चैतन्य निंबाळकर यांनी लोणंद पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी तपास सुरू केला. आदर्की बुद्रुक व खुर्द गावातील लोकांना ग्रामसुरक्षा यंत्रणा यावर संशयित सयाजी शंकर निंबाळकर यांचा शोध घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे घटनास्थळी दाखल झाले. आरोपी हा आदर्की गावात चिंचेचा मळा नावाच्या शिवारात ओढ्याजवळ असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पथकाने आदर्की खुर्द गावातील ग्रामस्थ, पोलीस यांच्या मदतीने सापळा रचून त्याला अटक केली.
संबंधितास न्यायालयात हजर केले असता त्याला 8 एप्रिल पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले करीत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, नितीन भोसले, नाना भिसे, चंद्रकांत काकडे, विठ्ठल काळे, अभिजीत घनवट, बापू मदने, सतीश दडस, सिद्धेश्वर वाघमोडे, चालक संजय चव्हाण यांनी सहभाग घेतला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |