सातारा : सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटालगत हॉटेल कासवूड परिसरात सोमवारी सकाळी कारचा भीषण अपघात होवून दोन मित्रांचा मु्त्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. सर्व युवक सातार्यातील असून जखमींवर उपचार सुरु आहेत.
अराहत कैसल शेख (वय १६, रा.गुरुवार पेठ), सोहेल कौजन अन्सारी (वय १८, रा.बुधवार पेठ, सातारा) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. उबेद मुर्तझा खान (वय १६, रा.केसरकर पेठ), अक्षय राम हमसागर (वय १७, रा. बॉम्बे रेस्टॉरंट परिसर), औवेस असद खान (वय १६, रा. शाहूनगर सर्व सातारा) अशी जखमी झालेल्या युवकांची नावे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हा अपघात सोमवारी सकाळी ७ वाजता घडला आहे. सर्व युवक हे सातार्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सोमवारी पहाटे हे सर्वजण युवक कारमधून कास रस्त्याकडे गेले होते. परत ते साताराकडे येत असताना भरधाव वेगात असलेल्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. कार नाल्यामध्ये जावून तेथून पुन्हा ती हॉटेलसमोर भिंतीवर आदळली. अपघाताचा आवाज एवढा मोठा होता की परिसर हादरुन गेला. अपघातात कारचा चक्काचूर होवून तीन युवकांना गंभीर दुखापत झाली. अपघातग्रस्त युवक किंचाळत होते मदतीसाठी याचना करत होते. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना बाहेर काढले. कारमध्ये पाच युवक असल्याचे समाेर आल्यानंतर नागरिकांनी सातारा तालुका पोलिसांना घटना कळवून युवकांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवले.
रस्त्यालगत व रस्त्यावर कार चक्काचूर होवून पडली होती. काचांचा थर व रक्ताचा सडा परिसरात पडला होता. उपचारावेळी दोन युवकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तोपर्यंत या घटनेची माहिती युवकांच्या कुटुंबियांना कळवल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. दोन युवकांच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना समजताच त्यांनी आक्रोश केला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. घटनेची माहिती घेवून पोलिसांनी पंचनामा केला. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |