09:19pm | Dec 05, 2023 |
सातारा : टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने आपले प्रमुख रिटेल स्टोर 'ड्यूराशाईन® शॉपी' साताऱ्यातील केएच पोरवाल, कराड येथे आज सुरु केले. या जिल्ह्यामध्ये ब्रँडच्या रिटेल विस्तारात उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल आहे. सर्व कलर कोटेड स्टील उत्पादने आणि सोल्युशन्स एकाच ठिकाणी खरेदी करता येतील अशी वन-स्टॉप सुविधा टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने उपलब्ध करवून दिली आहे. या एक्सक्लुसिव्ह स्टोरमुळे कराड, सातारा भागातील ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवात तसेच प्रीमियम कोटेड स्टील उत्पादनांच्या उपलब्धते मध्ये लक्षणीय वाढ होईल.
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या ड्यूराशाईन® रेन्जमध्ये शेती, व्यापार, निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांना उपयोगात आणता येईल अशी विविध उत्पादने आणि सुविधा उपलब्ध आहेत. ही उत्पादने प्रामुख्याने पशुपालन, पोल्ट्री फार्म्स, प्रोसेसिंग युनिट्स, बंगले, शेतीघरे, हॉटेल्स, रिसॉर्ट्स इत्यादींमध्ये उपयोगात आणली जातात. टिकाऊपणा, गंज प्रतिरोधक आणि दिसायलाही छान म्हणून नावाजला जाणारा ड्यूराशाईन® हा कलर कोटेड स्टील बाजारपेठेत सर्वाधिक विश्वसनीय ब्रँड्सपैकी एक आहे. 'ड्यूराशाईन® शॉपी' हा आगळावेगळा, खिळवून ठेवणारा अनुभव देणारा कस्टमर एक्सपीरियन्स झोन आहे. याठिकाणी आल्यावर ब्रँडसोबत संवाद साधण्याची संधी मिळते, छत आणि भिंतींच्या क्लॅडिंगसाठी वापरली जाणारी, विविध आकर्षक रंगांची अनेक उत्पादने याठिकाणी प्रदर्शित केलेली असतात. यामध्ये टाईल्स, फॉल्स सीलिंगसाठी लायनर पॅनल आणि पार्टिशन्स यांचा समावेश आहे. याखेरीज खूप छान अस्थेटिक्ससाठी वूडलाईन आणि इन्स्युलेटेड शीट्ससाठी कूलशील्ड यासारखी नाविन्यपूर्ण उत्पादने देखील याठिकाणी उपलब्ध आहेत.
एक्सपीरियन्स झोनमध्ये ग्राहक उत्पादनांना स्पर्श करू शकतात, ती प्रत्यक्षात कशी आहेत ते समजून घेऊ शकतात. याठिकाणी तज्ञ सेल्स टीम असते त्यांच्याकडून प्रत्येक उत्पादनाची सखोल माहिती करून घेतली जाऊ शकते. उत्पादनाची जाडी, गॉज, मजबुती परीक्षण, ब्रँड मार्क डिस्प्ले इत्यादी नीट जाणून घेऊ शकतात. उत्पादनाचा प्रत्यक्ष अनुभव, त्याची कार्यक्षमता, किमतीचे पुरेपूर मूल्य आणि त्यासाठी केलेल्या गुंतवणुकीवरील परतावा हे सर्व याठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांना माहितीपूर्ण खरेदीचा उत्तम अनुभव घेता येतो.
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर अनूप त्रिवेदी यांनी यावेळी सांगितले की, "संपूर्ण देशभरात सुरु करण्यात आलेल्या आमच्या एक्स्पेरिएन्शियल सेंटर्सचे उद्दिष्ट ग्राहक केंद्रिततेमध्ये सुधारणा करणे हे आहे. त्यासाठी आम्ही ड्यूराशाईन® टचपॉईंट्सना नाविन्यपूर्ण इन-स्टोर अनुभव प्रदान करतो, ज्यामध्ये तत्पर सेवा पुरवून, ग्राहकांना ब्रँडसोबत जोडून ठेवले जाते. आजचे ग्राहक चोखंदळ आहेत, त्यांच्या मागण्या सतत वाढत आणि बदलत आहेत. खरेदीचा निर्णय करण्याआधी उत्पादनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ते उत्सुक असतात. आमच्या ग्राहकांना सुयोग्य निवड करता यावी यासाठी ड्यूराशाईन® शॉपी हे उत्तम ठिकाण आहे."
व्यवसाय विस्ताराबरोबरीनेच टाटा ब्ल्यूस्कोप स्टील "शेल्टर फॉर ऑल" अर्थात प्रत्येकासाठी निवारा हे व्यापक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देखील बांधील आहे. लोकांच्या जीवनात प्रगती घडवून आणण्याच्या, समुदायांना साहाय्य प्रदान करण्याच्या आणि जगावर दीर्घकालीन व सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या मिशनचा देखील मध्ये समावेश होतो. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्ती आणि समुदाय यांचे कल्याण आणि महत्त्वाकांक्षा यावर लक्ष केंद्रित करून निवारा आणि घरांशी संबंधित गंभीर समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे हे टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे उद्दिष्ट आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |