कराड : राज्यात सर्वात जास्त पटसंख्या आणि गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या कराड (जि. सातारा) पालिका शाळा क्रमांक तीनची केंद्र शासनाच्या उदयोन्मुख भारतासाठी पंतप्रधान शाळा अर्थात 'पीएम श्री स्कूल' साठी निवड झाली आहे. या निवडीमुळे शाळेस भौतिक सुविधांसाठी एक कोटी ८८ लाखांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्याध्यापक कोळी म्हणाले, शाळेतील पाचवी शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कूल व विविध स्पर्धा परीक्षेसाठी शाळेचे ५०० हून अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. दिल्ली येथील केंद्र शासनाच्या निपा संस्थेने शाळेची यशोगाथा देशभर प्रसारीत केली आहे. सध्या शाळेची पटसंख्या दोन हजार ७८९ इतकी असून शाळेला स्वतःची बालवाडी आहे.
तीन तालुक्यातील ६० गावचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून शाळेकडे ५२ स्कूल बस आहेत. देशातील १५ हजार शाळा या योजनेअंतर्गत घेण्यात आल्या आहेत. राज्यातील ३११ शाळांची पीएम श्री स्कूलसाठी निवड करण्यात आली असल्याने राज्य प्रकल्प संचालक प्रदिपकुमार डांगे यांनी कळवले आहे. पालिका शाळा क्रमांक तीन ही सतत सात वर्षे राज्यात प्राथमिक विभागात पहिल्या क्रमांकवर आहे.
पटसंख्या आणि गुणवत्तेत इतर शाळांपुढे या शाळेने आदर्श ठेवला आहे. पीएम श्री स्कूलसाठी शाळेला नवीन वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, इमारतीची डागडूजी, अद्ययावत संगणक कक्ष, व्हर्च्युअल क्लासरुम, रंगरंगोटी, पाण्याची सुविधा यासाठीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होती. त्याअंतर्गत शाळेसाटी एक कोटी ८८ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे.
पीएम.श्री स्कूलसाठी निवड व्हावी म्हणून राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, राज्य प्रकल्प संचालक प्रदिपकुमार डांगे, राज्य समन्वयक सिध्देश वाडकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, शाळेचे आधारस्तंभ माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी प्रयत्न केले आहेत.
कराड पालिका शाळा क्रमांक तीनची निवड ही शाळेने केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे झाली आहे. शाळेची पीएम श्री स्कुलसाठी झालेली निवड ही सर्वोच्च अचिव्हमेंट आहे. त्यामध्ये शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षीका यांचे योगदान मोलाचे आहे. - अर्जुन कोळी
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |