09:35pm | Feb 10, 2024 |
सातारा : अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड नावाची दुरुस्ती धनगर अशी करावी, यासाठी म्हसवड येथे उपोषण सुरू असून शासनाकडून त्याची दखल घेतली नाही. मुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बैठक लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृत पत्र आलेले नाही. निवासी उपजिल्हाधिकार्यांनी एक साधे पत्र देवून दिशाभूल केल्याचा आरोप गणेश केसकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
केसकर म्हणाले, धनगर समाजातील पन्नास हजार बांधवांनी उपोषण स्थळी भेट दिली. धनगर समाज शांत आणि संयमी असल्याने उद्रेक झाला नाही. परंतु, सरकारचा कोणताही प्रतिनिधी धनगर समाजाच्या मागणीला गांभीर्याने घेत नाही. धनगर समाजाच्या नेत्यांनीही या उपोषणाची अद्याप दखल घेतली नसल्याची खंत केसकर यांनी व्यक्त केली.
केसकर पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे समाज बांधवांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी उपोषण सोडण्याचे आवाहन करत याबाबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृत असे कोणतेही पत्र आले नाही. जे पत्र आले, त्यातही धनगर समाजाचा एसटी संवर्गात समावेश होण्याच्या अनुषंगाने आंदोलन सुरू आहे, असा उल्लेख आहे. परंतु, हे आंदोलन हे अनुसुचित जमातीच्या यादीत समावेश करण्यासाठी नाही तर जे नाव आहे, त्यात दुरुस्ती करण्यासाठी आहे. यादीत धनगर समाजाचा उल्लेख धनगड आहे. ही दुरुस्ती केंद्र शासनच करू शकते. परंतु, त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दुरुस्तीच्या शिफारसीची गरज आहे. त्यासाठी आमचा लढा सुरु आहे. मात्र, शासनाच्या आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. अन्यथा प्रखर आंदोलनाचे हत्यार नाईलाजाने उपसावे लागेल, असेही केसकर म्हणाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या साध्या पत्राची होळी करण्यात आली.
यावेळी म्हसवडमधील गणेश केसकर यांच्या समवेत बाळराजे वीरकर, इंजि.महादेव शिगाडे, अविनाश म्हासाळ, हनुमंत ढवान, सुखदेव दिडवाघ, राजू गोरे आदींची उपस्थिती होती.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |