08:53pm | Mar 05, 2023 |
वडूज : न्यायालयात दिवाणी, फौजदारी,सिव्हिल अशा अनेक ठिकाणी काम करत असताना अवघड आतील अवघड कामे केली पाहिजेत. इव्हिडन्स ॲक्ट बरोबर कुस्ती खेळायला शिकले पाहिजे तर यश मिळतं कारण भारतीय राज्यघटना मोठा कल्पवृक्ष असून कधी नष्ट होणार नाही. कायदा हा राजांचा राजा असून राजालाही शिक्षा होऊ शकते.अशा शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व वडूज बार असोसिएशनचे माजी सदस्य न्या. संजय देशमुख यांनी वडूज न्यायालयात झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी केले.
या वेळेला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा सह जिल्हा न्यायाधीश ए. एस .जाधव, न्या. आर. व्ही. हुद्दार , न्या देशमुख यांच्या पत्नी सौ लताताई देशमुख ,वडून बारा असोसिएशनचे अध्यक्ष ऍड . प्रशांत पाटील, न्या. डी. डी. फुलझेले, न्या. एम. सी. नेपते, न्या एस. आर. गोळवे, सेवानिवृत्त न्या. पी. वाय. काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत खेळीमेळ्याच्या वातावरणामध्ये व घरगुती पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाला बहुमूल्य मार्गदर्शन लाभल्यामुळे उपस्थितांनी ही चांगलीच दाद दिली. न्यायालयाची पायरी कधी चढू नये असे अनेकदा म्हटले जाते परंतु, याच न्यायालयात ज्ञान अमृत मिळाल्याची भावना झाली होती.
प्रमुख मार्गदर्शिका असलेले न्या. देशमुख म्हणाले, सज्जनगडला गेले की सज्जन होते का? असा शालेय जीवनात भाबडा प्रश्न केला होता. त्यानंतर कालांतराने बारा दिवस सज्जनगडावर मुक्काम केल्यानंतर माझ्यातील बराचसा राक्षस कमी झाला. अखंड सावधान असावे. पहाटे ओमकार व भामरी म्हटल्यानंतर चैतन्य मिळते. सध्या कायद्यामध्ये प्रत्येक वेळी बदल होत असताना निसर्गाचा कायदा आपण सर्वांनी पाळला पाहिजे. शेतकरी, सैनिक आणि कायदा हा महत्त्वाचा आहे. मंत्रालयामध्ये विधी खात्याच्या मार्फत काम करत असताना असे निदर्शनास आले की ,मंत्रालयातील वरिष्ठ पातळीवरील अधिकारी व न्यायालयातील अधिकारी आजारी पडतात. त्याबाबत चिंता व्यक्त करण्यापेक्षा प्रॉब्लेम ला कोणता कायदा लागतो. याची माहिती घेणे गरजेचे आहे .एकत्र बसून अभ्यास केल्यामुळे आपली बुद्धिमत्ता वाढते आणि आपले एकमेकांच्या वैचारिक देवाण-घेवांमुळे प्रगल्भता निर्माण होते. असे त्यांनी स्पष्ट केले.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास स्वामी, संत गाडगेबाबा, लोकहितवादी अशा लोकांच्या पुस्तकाचे वाचन केल्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी कळतात. महिलांच्या बाबतीत खूप मोठा कायदा जरी असला तरी महिलांकडे खूप मोठे शस्त्र आहे. ते शस्त्र म्हणजे नखं, हात,पाय, दात, डोळे आणि आणि खाकरून थुंकणे ही मोठी शस्त्र आहेत.
लपलेला कायदा करण्यासाठी आपण एकत्रित अभ्यास केला पाहिजे. सी.ओ.एच.आय.आर.ए. कोहरा म्हणजे रिलेबल ऍडमिशन इंटरप्रिटेशन असे अनेक प्रकारे आपल्याला शिकता आले पाहिजे. हृदयात वाईट माणूस ठेवू नका. मायेची माणसं ठेवा असाही त्यांनी सल्ला दिला.
वकिली करताना गेमा आल्या पाहिजेत पण विवेक सोडला नाही पाहिजे. महिलांकडे पाहताना सारखं बघू नका हे सुद्धा चांगले वागणे असून त्याला सुद्धा न्याय दिल्याचे म्हटले जाते. असे त्यांनी विनोदाने सांगितले. या वेळेला प्रात्यक्षिक दाखवून त्यांनी माणसांच्या मनातील बदल कसे करतात. त्यांनी कपाळावर हात ठेवा असे सांगितले पण त्याचे अनुकरण करताना अनेकजण चुकले.
प्रास्ताविक भाषणामध्ये ऍड. प्रशांत पाटील म्हणाले, हा आनंदाचा उत्सव आहे. राज्यघटनेने लोकशाहीत अंतर्भूत केलेले आहे आजही न्यायपालिकेबद्दल लोकांचा विश्वास कायम टिकून ठेवलेला आहे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे, मराठा साम्राज्यांमध्ये त्यांनी खूप मोठे काम केलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती गजेंद्र गडकर, अलाहाबादचे दिलीप भोसले,मेघालय येथील निमसोडचे न्यायाधीश देशमुख अशा मान्यवरांची त्यांनी आठवण करून देऊन न्यायमूर्ती संजय देशमुख यांनीही परंपरा कायम राखण्याची सांगितले. या वेळेला न्या. मोरेश्वर कुलकर्णी, न्या. मंगेश पांडे, न्या. महेश खराडे, न्या. गौरव हांगे, न्या. निवास खराडे,न्या. मिलिंद देशमुख, न्या. चैतन्य देशपांडे, न्या. प्रसाद देशपांडे, न्या. श्रीकांत देवकर, सरकारी वकील विपुल कोकाटे, योगेश चन्ने, वैभव काटकर निंबाळकर मॅडम, वैशाली मुळे, साळुंखे यांचाही सत्कार करण्यात आला योगेश चन्ने, च सेवानिवृत्त न्यायाधीश पी वाय काळे आधी मान्यवरांचा ही सत्कार करण्यात आला चे सूत्रसंचालन एडवोकेट खामकर यांनी केले सन्मान पत्राचे वाचन एडवोकेट संतोष भोसले यांनी केले व आभार यांनी मानले या कार्यक्रमात शेर शायरी मुळे चांगलीच रंगत आणली होती. या सोहळ्याला ऍड एकनाथ जाधव, अशोक बैले, ऍड प्रदीप गोडसे,ऍड राजीव चव्हाण,ऍड बापू जमदाडे, ऍड जाधव, भूषण तोडकर,कौस्तुभ इनामदार,बेलवडकर मॅडम, सचिन पोतदार,ऍड कारंडे,ऍड विजय शिवाजी जाधव, नंदकुमार गोडसे, एम एम घाडगे, वडूज येथील महसूल, पोलीस, बांधकाम विभाग व न्यायालयात कर्मचारी उपस्थित होते.आभार ऍड नंदकुमार वाघमोडे यांनी मानले.
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |