09:32am | Feb 22, 2024 |
सातारा : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या नव्याने झालेल्या निवडीत अध्यक्ष पदी किरण यादव यांची तर उपाध्यक्षपदी शहाजी खाडे यांची बहुमताने निवड झाली. त्यांना १८ मते मिळाली तर विरोधी गटाने अध्यक्ष पदासाठी महेंद्र जानुगडे यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी विजय शिर्के यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांना एकूण तीन मते मिळाली. अध्यक्षपदाचा गुंता मात्र, बलवंत पाटील यांच्या मध्यस्तीने सुटला.
शिक्षक सहकारी बॅंकेचे पदाधिकारी सहा ते सात महिन्यातून बदलले जात आहेत. सर्वांना पदाधिकारी होण्याची संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज बॅंकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी झाल्या. यावेळी दोन्ही बाजूंनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी चार जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे मतदान घेण्यात आले. यामध्ये शिक्षक समिती, संभाजीराव पाटील गट शिक्षक संघ, दौंदे गट शिक्षक संघ यांच्यावतीने अध्यक्षपदासाठी किरण यादव तर उपाध्यक्षपदासाठी शहाजी खाडे यांचा अर्ज दाखल झाले. तर विरोधी गटाकडून अध्यक्ष पदासाठी महेंद्र जानुगडे तर उपाध्यक्ष पदासाठी विजय शिर्के यांचा अर्ज दाखल केला होता. यावेळी झालेल्या मतदानात १८ विरुद्ध तीन मतांनी सत्ताधाऱ्यांचे पदाधिकारी विजयी झाले. त्यानुसार किरण यादव यांची अध्यक्षपदी तर शहाजी खाडे यांची उपाध्यक्षपदी बहुमताने विजयी झाले. तर विरोधी गटाचे महेंद्र जानुगडे व विजय शिर्के यांना प्रत्येकी तीन मते मिळाली. अध्यक्षपदासाठी यावेळी फारच चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, अखेर बलवंत पाटील यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.
यावेळी दोन्ही नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बलवंत पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, समितीचे अध्यक्ष विश्वभंर रणवरे, अखिल भारतीय शिक्षक संघ दौंदे गटाचे नेते दीपक भुजबळ, शिक्षक समितीची नेते शंकर देवरे, मावळते पदाधिकारी राजेंद्र बोराटे, विजय बनसोडे, नवनाथ जाधव, शशिकांत सोनवलकर, दीपक गिरी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे, यांच्यासह बॅंकेचे संचालक उपस्थित होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |