04:34pm | Apr 10, 2024 |
सातारा : शेंद्रे ता. सातारा येथील माळरानावर स्व. भाऊसाहेब महाराजांनी लावलेल्या सहकाररूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना सातारा तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील हजारो शेतकरी आणि कामगार, ऊस तोडणी मजूर यांचे सुखाचे संसार चालवत आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सक्षम झाला असून तालुक्यातील एक मोठी संस्था बनला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देणारा हा कारखाना आज पूर्णपणे सक्षम झाल्याने स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३- २४ च्या गळीत हंगामाची सांगता शेवटच्या ११ साखर पोत्यांच्या पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती वनिता गोरे, सरिता इंदलकर, राजू भोसले, सतीश चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश सावंत, कांचन साळुंखे, अरविंद चव्हाण, राहुल शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी कामगार यांचा सत्कार करण्यात आला. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'ऊस घालीन तर फक्त अजिंक्यतारालाच' असे ब्रीद आता झाले आहे. याला कारण आपल्या कारखान्याने कमावलेली विश्वासाहर्ता आहे. उच्चतम दर देण्याबरोबरच गाळपास येणाऱ्या उसाला वेळेत पेमेंट देणारा कारखाना असा आपल्या कारखान्याचा नावलौकिक आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये कामगार, कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे. अडचणीचा काळ असताना अत्यंत नेटके, काटेकोर, नियोजनपूर्ण कामकाज करून कारखान्याने १५६ दिवसात ७ लाख ५५ हजार मे. टन गाळप केले आहे. १२.६५ टक्के एवढा उच्चतम साखर उतारा असून ९ लाख २९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. हा हंगाम ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद यांच्या सहकार्यामुळेच यशस्वी झाला आहे. यापुढेही आपल्या सर्वांचे सहकार्य कायम राहू द्या, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी केले.
व्हा.चेअरमन सावंत यांनी स्वागत केले. संचालक विश्वास शेडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व आजी, माजी संचालक, वाहतूक संस्थेचे बाळकृष्ण फडतरे, अजिंक्यतारा सूत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, उपाध्यक्ष जालिंदर महाडिक, संचालक वसंतराव टिळेकर, पंडितराव सावंत, अजित साळुंखे, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, मधुकर पवार, अरुण कापसे, धनाजी जाधव, आनंदराव कणसे, विजय पोतेकर, राजेंद्र यादव, युनियनचे अध्यक्ष कृष्णा धनवे, सयाजी कदम यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, कामगार, सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |