सातारा : फक्त बोलून नाही, तर कामातून आपला ठसा उमटविणारे सांगलीचे सुपुत्र, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक जलसंपदा विभागात अतिउत्कृष्ट काम केलेले, शिस्तप्रिय अधिकारी अशी ख्याती असणारे, अभियंता अरूण रामचंद्र नाईक यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून नुकतेच गौरविण्यात आले आहे. लवकरच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून राज्य शासनाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
अरूण नाईक यांनी जलसंपदा विभागात सन 2000 साली सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून शासनाच्या सेवेचा प्रारंभ केला. यानंतर प्रथम नियुक्ती निम्न दुधना प्रकल्प सेलू पदी पदोन्नती मिळाल्यानंतर भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर, लेंडी प्रकल्प नांदेड व मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक याठिकाणी उत्कृष्ट काम करून नावलौकीक मिळवला. 2015 साली अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद, गुणनियंत्रण मंडळ, औरंगाबाद, मराठवाडा पाटबंधारे महामंडळ, औरंगाबाद व लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर येथे काम पाहिले. अहमदनगर जिल्ह्यातील सन 1 9 70 साली मंजूर झालेल्या निळवंडे प्रकल्पाचे काम भूसंपादन होऊन देखील जनतेच्या वाढत्या विरोधामुळे लांबणीवर पडले होते. जवळपास 50 वर्षापासून प्रलंबित असलेले निळवंडे प्रकल्पाचे काम अरुण नाईक यांनी पोलिस प्रशासनाची मदत घेवून अवघ्या चार वर्षात पूर्ण केले. सदर प्रकल्पाच्या कालव्याचे काम सी चॅनेल या अत्याधुनिक प्रकारचा अवलंब करून यामध्ये शासनाची सुमारे 82 कोटी रूपयांची बचत केलेली आहे.
निळवंडे प्रकल्पाच्या उत्कृष्ट कामाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये करून प्रशंसा केली आहे. या त्यांच्या उत्कृष्ट कामांबद्दल महाराष्ट्र शासनाने अरूण नाईक यांना उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरविलेले आहे. शासनाकडून उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरविण्यात आल्याने अरूण नाईक, अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सातारा यांचे शासकीय, सामाजिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |