शिरवळ : शिरवळ येथील पळशी रोड याठिकाणी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका सराईत टोळीच्या दोन युवकांकडून विनापरवाना बाळगलेल्या एक देशी बनावटीचे पिस्तूल, २ जिवंत काडतुसे व दुचाकी, असा एक लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
घटनास्थळ व शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त वाढविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शिरवळचे पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, शंकर पांगारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक धर्मसिंह पावरा, पोलिस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर आदीजण गस्त घालत होते.
पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांना पळशी रोडला असणाऱ्या एका अपार्टमेंटच्या वाहनतळ आवारात दोन युवक संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. संबंधित ठिकाणी पथकाने छापा टाकला असता त्याठिकाणी दुचाकी (एमएच ०२ डीडी ५९३०) या दुचाकीवर संशयास्पदरीत्या बसलेल्या दीपक संतोष पाटणे (वय २२, रा. विंग, ता. खंडाळा), ओम सतीश कदम (१८, रा. लोणी, ता. खंडाळा) आढळले. यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळील कापडी पिशवीमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आढळली. यावेळी पिस्तूल, काडसुतांसह दुचाकी, असा एक लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विनापरवाना पिस्तूल व काडतुसे बाळगल्याप्रकरणी पोलिस अंमलदार मंगेश मोझर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. यावेळी शिरवळ पोलिसांनी दीपक पाटणे, ओम कदम याला अटक करीत खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक धर्मसिंह पावरा तपास करीत आहेत.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |