09:17pm | Dec 08, 2023 |
दहिवडी : राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक आणि दहिवडी नगरपंचायत मधील भाजपप्राणित विद्यमान नगरसेवक रुपेश मोरे यांनी स्वतःच स्वछ दहिवडीसाठी गुरुवारी सकाळी घंटागाडी हातात घेतल्याने नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. नगरपंचायत प्रशासन आणि कर्मचारी झोपा काढत आहेत का? असा सवाल नगरसेवक रुपेश मोरेंच्या यांनी केलेल्या कामामुळे दहिवडीकर दबक्या आवाजात चर्चेदरम्यान विचारू लागले आहेत.
नादुरुस्त घंटागाडी गेल्या अनेक दिवसापासून नगरपंचायत इमारतीच्या पाठीमागे उभ्या आहेत. ठेकेदाराला नगरपंचायतीने बिल अदा करून देखील घंटागाड्या अद्यापही नादुरुस्त आहेत. याकामी मुख्याधिकारी यांनी दुर्लक्षाची भूमिका घेतल्यानेच नगरसेवकाला स्वच्छतेसाठी घंटागाडी हाती घ्यावी लागल्याची चर्चा आज दहिवडीभर रंगली होती.
नादुरुस्त घंटागाडी दुरुस्त करत त्यात स्वतः डिझेल टाकून दहिवडीच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेणारे नगरसेवक रुपेश मोरे आज दहिवडीकरांच्या नजरेत हिरो बनले आहेत. मात्र नगरपंचायतीचे कर्मचारी पगार घेऊन झोपा काढत आहेत का? मुख्याधिकार्यांचं नगरपंचायतीच्या कामावर लक्ष नाही का? असे अनेक सवाल दहिवडीकर उपस्थित करू लागल्याने स्वच्छतेबाबत दहिवडी नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापुढे तरी नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छतेच्या दृष्टीने कोणते प्रयत्न केले जाणार? गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत असलेल्या घंटागाड्या थांबून राहिल्याने दहिवडीत साचलेला कचरा डेपोत पोहचणार का? नगरसेवक रुपेश मोरेंनी घालून दिलेला आदर्श दहिवडी नगरपंचायत जपणार का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीप्रणित पॅनेलची सत्ता असणार्या दहिवडी नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळेच विरोधात असतानाही आम्हाला लोकांची सेवा करावी वाटते. मात्र राष्ट्रवादीच्या लोकांना याच काही घेणंदेणं पडलेलं नसल्याने मला ही भूमिका वठवावी लागली.
- नगरसेवक रुपेश मोरे, दहिवडी नगरपंचायत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |